सात्रळ (वार्ताहर) :- राहुरी तालुक्यातील सात्रळ पंचक्रोशी येथे बुधवारी 23 तारखेस, युवानेते किरण कडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवाद...
सात्रळ (वार्ताहर) :-
राहुरी तालुक्यातील सात्रळ पंचक्रोशी येथे बुधवारी 23 तारखेस, युवानेते किरण कडू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस तर्फे आयोजित शेतकरी मेळावा आ.निलेश लंके यांचे प्रमुख उपस्थितीत व माजी मंत्री आ. प्राजक्त तनपुरे यांचे अध्यक्षतेखाली पार पडणार आहे.
राहुरी तालुका व सात्रळ पंचक्रोशीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. लंपी सदृश आजाराने दुध उत्पादक शेतकरी हवालदिल झाला. नुकत्याच उच्च न्यायालयाने दिलेल्या गायरान मधील अतिक्रमण काढण्यासाठी निकालाने भयभीत झालेल्या ग्रामस्थांना दिलासा देण्यासाठी व इतर अनेक विकासात्मक विषयांवर या शेतकरी मेळाव्यात चर्चा होणार आहे.
अडीच वर्षानंतर राज्यामध्ये शिंदे फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर राहुरी तालुक्याची विकासाची गती मंदावली असून, रस्ते, पाणी योजनेची कामे रखडली आहेत . या सर्व विषयावर आ. प्राजक्त तनपुरे व आ. लंके वाच्या फोडणार का या बदल मतदार संघातील शेतकऱ्यांना उत्सुकता लागली आहे.
अहमदनगर जिल्हा अतिवृष्टी व पिक विम्याबाबत आ. तनपुरे यांनी संताप व्यक्त करत तालुक्यात आंदोलने केली. परंतु सरकारने त्या कडे दुर्लक्ष केल्यास जिल्हाभर आंदोलनाची घोषणा या शेतकरी मेळाव्यात होण्याची शक्यता आहे. अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले शेतकऱ्यांना पिक विमा कंपनी शेतकऱ्यास योग्य नुकसान भरपाई द्यायला तयार नाही, शेतकऱ्यांचे कपाशी व सोयाबीनचे उत्पादन घटले. केंद्राकडून शेतकऱ्यांना दुजाभावाची वागणूक दिली जाते. परदेशातून पाम ऑईल आयात केल्यामुळे तेलबियांचा भाव उतरला अशा अनेक विषयांवर या शेतकरी मेळाव्यात चर्चा होऊन आ. लंके व आ. तनपुरे कडून मोठी घोषणा होणार असल्याची चर्चा परिसरात होत आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत