राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील वांबोरी येथे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांच्या प्रसाद शुगर कारखान्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज गुरुवार १७ नोव्हेंबर रोजी सकाळी गेट बंद आंदोलन सुरू केले.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटनेचे पदाधिकारी,कार्यकर्ते व शेतकर्यांनी हे गेट बंद आंदोलन सुरू केले आहे. या ठिकाणी तहसीलदार एफ.आर.शेख, पोलीस निरीक्षक प्रतापराव दराडे यांच्यासह पोलीस कर्मचारी दाखल झाले आहे.
*काय आहे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मागण्या*
१) सन २०२१-२२ हंगामात गाळपास गेलेल्या उसासाठी एफआरपी अधिक २०० रूपये अंतिम भाव मिळावा. व राज्या सरकारने त्यासाठी ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करून आरएसएफ प्रमाणे येणारा भाव देण्यासाठी साखर कारखान्यांना आदेश द्यावेत.
२) राज्य सरकारने एफआरपी चे दोन तुकडे करण्यासाठी ऊस दर नियंत्रण अद्यादेशमध्ये केलेली दुरूस्ती त्वरीत मागे घेऊन येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये पुन्हा दुरूस्ती करून एकरकमी एफआरपी देण्याचा कायदा करावा. तोपर्यंत साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीच्या सरासरी उताऱ्याच्या आधारावर या सिझन मध्ये म्हणजेच सन २२-२३ च्या हंगामामध्ये एकरकमी एफआरपी द्यावी.
३) ऊस तोडणी मजूर हे स्वर्गीय गोपीनाथ मुंडे महामंडळामार्फतच मजूर पुरवावेत. जोपर्यंत हा निर्णय होणार नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या ऊस बिलातून अथवा कारखान्याकडून महामंडळाने वर्गणी वसूल करू नये
४) केंद्र सरकारने ६० लाख टन साखरेच्या निर्यातीस परवानगी दिलेली आहे. अजून तीस लाख टन साखर निर्यातीस परवानगी द्यावी. तसेच निर्यातीस कोटा सिस्टिम न लावता ओपन जनरल लायसन (ओजीएल) अंतर्गत जे पहिले निर्यात अतील त्यांना यात यावे. सरकारने दिलेला कोटा संपेपर्यंत मुक्त परवाना द्यावा.
(५) केंद्र सरकारने साखरेची किंमत ३५०० रूपये प्रतिकिंटल निश्चित करून इथेनॉलच्या किमतीमध्ये प्रतिलिटर ५ रूपयांची वाढ करावी..







कोणत्याही टिप्पण्या नाहीत