राहुरी(वेबटीम) अतिवृष्टीच्या पंचनाम्यासाठी खुडसरगाव येथील तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांकडून शेतकर्ऱ्यांना पेैशांची मागणी होत असल्याची तक्रार श...
राहुरी(वेबटीम)
अतिवृष्टीच्या पंचनाम्यासाठी खुडसरगाव येथील तलाठी व महसूल कर्मचाऱ्यांकडून शेतकर्ऱ्यांना पेैशांची मागणी होत असल्याची तक्रार शेतकरी वर्गाने आ.लहू कानडे यांच्याकडे केली होती.
*आवाज जनतेचा वेबपोर्टलने फोडली होती सर्वप्रथम वाचा...*याप्रकरणी आवाज जनतेचा वेबपोर्टलने सर्वप्रथम आवाज उठविला होता. या प्रकरणी तक्रारीची खातेनिहाय चौकशी करून राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील कामगार तलाठी सुवर्णा शिंदे यांच्या निलंबनाचे आदेश प्रांताधिकारी अनिल पवार यांनी काढले आहेत.
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथे शेती पिकाच्या पंचनाम्यासाठी पैसे मागीतल्याचा प्रकार घडला असता कृषी सहायक, ग्रामसेविका तसेच ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आल्याची घटना ताजी असतानाही राहुरी तालुक्यातील खुडसरगाव येथील तलाठी व महसूल कर्मचारी पंचनाम्यासाठी शेतकऱ्यांकडे पैशाची मागणी करत असल्याच्या तक्रारी काही शेतकऱ्यांनी आ.कानडे यांच्याकडे केल्या होत्या.आ.कानडे यांनी या प्रकरणाची दखल घेत जिल्हाधिकारी डॉ.भोसले यांना पत्र पाठवून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली होती.
'आवाज जनतेचा' वेबपोर्टलने नेवासा पाठोपाठ राहुरीतही पंचनाम्यासाठी पैसे घेतल्याचे वृत्त सर्वप्रथम प्रसिद्ध करून या प्रकरणावर कटाक्ष टाकला होता.
दरम्यान श्रीरामपूरचे प्रांताधिकारी अनिल पवार यांनी खुडसरगाव येथील कामगार तलाठी सुवर्णा शिंदे यांच्या निलंबनाचे काढले आहेत. या कारवाईमुळे शेतकरी वर्गातून समाधान व्यक्त होत आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत