राहुरी फॅक्टरी बस स्टँड परिसरात खरेदीसाठी आलेल्या मायलेकी बेपत्ता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी बस स्टँड परिसरात खरेदीसाठी आलेल्या मायलेकी बेपत्ता

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- दिवाळी निमित्ताने गणेगाव येथे आपल्या माहेरी आलेल्या व ब्राह्मणीतील रहिवासी असलेल्या मायलेकी आज सायंकाळी राहुरी फॅक...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-


दिवाळी निमित्ताने गणेगाव येथे आपल्या माहेरी आलेल्या व ब्राह्मणीतील रहिवासी असलेल्या मायलेकी आज सायंकाळी राहुरी फॅक्टरी परीसरात खरेदीसाठी आल्या असता बेपत्ता झाल्याची घटना घडली. या मायलेकींंचा नातेवाईक शोध घेत आहे.


याबाबत समजलेली माहिती अशी की, ब्राह्मणी येथील रहिवासी असलेले नितीन हापसे यांची पत्नी प्रतीक्षा( वय २२)व  त्यांची ३ वर्षाची मुलगी हे गणेगाव येथे दिवाळी निमित्ताने गणेगाव येथे प्रतीक्षा हिच्या माहेरी आले होते.


आज ब्राह्मणी येथे आपल्या घरी जाण्यापूर्वी राहुरी फॅक्टरी येथील नगर मनमाड मार्गावरील एका कपड्याच्या दुकानात खरेदीसाठी थांबले. याच वेळी अचानकपणे प्रतीक्षा व तिची छोटी मुलगी या दोघी बेपत्ता झाल्या.


सोबत असलेले नितीन हापसे यांनी परिसरात सगळी शोध घेतला मात्र त्या दोघी मिळून आल्या नाही.प्रतीक्षा हिच्या मोबाईलवर फोन केला असता तो देखील बंद दाखविला.

  पत्नी व मुलगी गायब झाल्याने नितीन हापसे  पुरते  घाबरून गेले. त्याने तातडीने राहुरी तालुक्यातील ब्राह्मणी,गणेगाव येथील नातेवाईक तसेच गणेगावचे सरपंच अमोल भनगडे, किशोर कोबरणे यांना सदर प्रकार सांगितला. 




त्यानंतर अमोल भनगडे व पत्रकार घाडगे यांनी राहुरी पोलिसांशी संपर्क साधला. पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी सायबर यंत्रणेमार्फत  मोबाईल लोकेशन तपासले असता कराळेवाडी परिसरात ५ वाजेच्या लोकेशन मिळून आले.  परंतु त्यानंतरची माहिती मिळून आली नाही.


 अमोल भनगडे, आरपीआय जिल्हाध्यक्ष भाऊसाहेब पगारे, शिवाजी घाडगे, महेश भनगडे , ओंकार कोबरणे व नातेवाईकांनी  राहुरी फॅक्टरी, देवळाली व परिसर पिंजून काढला मात्र बेपत्ता मायलेकि मिळून आल्या नाही.


दरम्यान वरील फोटोतील मायलेकी कोठे आढळून आल्यास राहुरी पोलीस स्टेशन 02426-232433, अमोल भनगडे,मो-98816 15426,ओंकार कोबरने - 7796761566 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.




मायलेकि मिसींगबाबत राहुरी पोलीस ठाण्यात  मिसींगबाबत तक्रार दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत