आंबी/वेबटीम:- आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मित्रपक्षाने सन्मानाने अपेक्षित जागा दिल्या नाहीत. तर...
आंबी/वेबटीम:-
आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपालिका व ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मित्रपक्षाने सन्मानाने अपेक्षित जागा दिल्या नाहीत. तर या निवडणुकीत स्वबळावर लढविण्याची तयारी आहे असे प्रतिपादन रिपाई (आठवले गट) उत्तर नगर जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांनी व्यक्त केले.
चांदेगाव (ता. राहुरी) येथे रिपब्लिकन पक्षाच्या महिला आघाडी शाखेच्या उद्घाटन प्रसंगी सुरेंद्र थोरात बोलत होते. कार्यक्रमाच्या विभागीय जिल्हाप्रमुख भीमराज बागुल अध्यक्षस्थानी होते. तर जिल्हा संपर्कप्रमुख श्रीकांत भालेराव, सिद्धांत सगळगिळे, विलास साळवे, प्रदीप भोसले, सीमा बोरुडे, रिपाईच्या महिला आघाडी तालुकाध्यक्ष स्नेहल सांगळे, सुनील चांदणे, छाया दुशिंग, चांदेगावचे सरपंच दत्तात्रेय खर्डे, किशोर गायकवाड, संतोष खर्डे, श्रीनिवास शिंदे उपस्थित आदी ग्रामस्थ उपस्थित होते.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना थोरात म्हणाले, की चांदेगाव येथे जातीयवादाला थारा नाही. सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. किरकोळ वाद एकत्र बसवून मिटवितात. या गावाचा जिल्ह्याने आदर्श घेण्यासारखा आहे. जातीयवाद संपुष्टात आला पाहिजे. त्यासाठी समाजातील प्रत्येक घटकांकडून प्रामाणिक प्रयत्न असले पाहिजेत. गावाच्या संस्कृतीला बाधा निर्माण होणार नाही. कुणावर विनाकारण अन्याय होणार नाही.
याची कार्यकर्त्यांनी दक्षता घ्यावी. न्याय हक्कासाठी नेहमीच जागृत राहिले पाहिजे. जर कुणी संघटनेच्या बळावर काही उद्योग करीत असेल. तर ते कदापिही खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा थोरात यांनी दिला. शासनाच्या विविध लोक कल्याणकारी योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन भीमराज बागुल यांनी केले.
प्रसंगी अध्यक्ष ऋषी भोसले, उपाध्यक्ष किरण भोसले, महिला अध्यक्ष सरिता भोसले, महिला उपाध्यक्ष राणी भोसले आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
“तळागाळातील माता-भगिनींच्या न्याय हक्कांसाठी रिपाई महिला आघाडी लढत आहे. शासनाच्या सर्व प्रकारच्या योजना महिलांपर्यंत पोहोचवणे, महिलांच्या उन्नतीसाठी गावोगावी बचत गट स्थापन करणे, महिलांवरील अन्याय अत्याचाराला पायबंद घालणे आदी उपक्रम जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पक्षाच्या महिला आघाडीच्या वतीने तालुक्यात राबवणार आहोत.” – स्नेहल सांगळे (तालुकाध्यक्ष, रिपाई महिला आघाडी)






कोणत्याही टिप्पण्या नाहीत