राहुरी(वेबटीम) नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे काम प्रेरणा पतसंस्था,मल्ट...
राहुरी(वेबटीम)
नगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वसामान्यांच्या आयुष्यात बदल घडवून त्यांना आर्थिक सक्षम करण्याचे काम प्रेरणा पतसंस्था,मल्टीस्टेटसारख्खा संस्थेने केले आहे. खऱ्या अर्थाने सहकार टिकवून वाढविण्याचे काम सुरेश वाबळे व त्यांचे सहकारी करत असल्याचा अनुभव मी महाविकास आघाडीत सहकार मंत्री असताना घेतला असल्याचे प्रतिपादन राज्याचे माजी सहकारी मंत्री व कराड उत्तरचे लोकप्रतिनिधी आ.बाळासाहेब पाटील यांनी केले.
गुहा येथील प्रेरणा ग्रामीण पतसंस्थेस शनिवारी सायंकाळी माजी सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी सदिच्छा भेट देऊन संस्थेची पाहणी केली.प्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांच्या समवेत फलटणचे आ.दिपकराव चव्हाण होते. प्रारंभी संस्थेचे संस्थापक चेअरमन सुरेश वाबळे यांच्या हस्ते आ.पाटील व आ.चव्हाण यांचा सन्मान करण्यात आला. प्रास्तविक प्रा.लांबे यांनी केले.
पुढे बोलताना माजीमंत्री पाटील म्हणाले की, राज्यात स्व: मालकीच्या वास्तू असणाऱ्या संस्था अत्यल्प आहेत. परंतु प्रेरणा पतसंस्था व मल्टीस्टेटच्या चांगल्या कारभारामुळे हे होऊ शकले आहे. म्हाविकास आघाडी सरकारच्या काळात सहकारमंत्री म्हणून काम करत असताना सुरेश वाबळे यांची पतसंस्था चळवळीतील प्रश्न सोडवण्यासाठीची तळमळ जवळून बघितली असल्याचे माजी मंत्री पाटील म्हणाले.
यावेळी बोलताना प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे म्हणाले की, माजी खा.प्रसाद तनपुरे यांच्या मार्गदर्शनानुसार सहकार क्षेत्रात काम करत असताना सर्वसामान्य शेतकरी व छोट-मोठे व्यावसायिक यांना केंद्र बिंदू मानून प्रेरणा पतसंस्था-मल्टीस्टेट सोसायटीचे काम सूरु आहे. राज्यात पतसंस्था चळवळीत काम करत असताना माजीमंत्री बाळासाहेब पाटील यांचे सहकार्य लाभल्याचे वाबळे म्हणाले.
याप्रसंगीप्रेरणा मल्टिस्टेट व्हा. चेअरमन विष्णुपंत वर्पे व्हा. चेअरमन मच्छिंद्र हुरूळे व्हा. चेअरमन अशोक उर्हे सरपंच गंगाधर चंद्रे उपसरपंच रामा बर्डे, सुजित वाबळे, डॉ वाबळे, अशोक चंद्रे, संजय शिंदे, सुखदेव कोळसे, सर्व संचालक मंडळ व ग्रामस्थ उपस्थित होते.
मोठ्या घरच पोरग काय काम करणार पण....
प्राजक्त तनपुरे नगराध्यक्ष होऊन आमदार झाले आणि पहिल्याच वेळी त्यांना मंत्रिपदाची संधी मिळाली.आम्हाला वाटलं हे मोठया घरातील पोरग काय काम करणार? परंतु ऊर्जा-नगरविकास खात्याच्या माध्यमातून अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. विधानभवनात प्रश्नोत्तरे दरम्यान अत्यंत शांतपणे त्यांची उत्तर देण्याची पद्धत वाखडण्याजोगी होती. असे माजीमंत्री पाटील म्हणाले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत