गंगापूर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

गंगापूर येथे विविध विकास कामांचे उद्घाटन

  आंंबी(वेबटीम)  राहुरी तालुक्यातील गंगापूर येथे सुमारे पाऊण कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लह...

 आंंबी(वेबटीम)



 राहुरी तालुक्यातील गंगापूर येथे सुमारे पाऊण कोटींच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार लहू कानडे यांच्या हस्ते संपन्न झाले. गंगापूरचे प्रथम लोकनियुक्त सरपंच सतीश खांडके यांच्या विशेष प्रयत्नातून व सातत्याने पाठपुरावा करून जल जीवन मिशन अंतर्गत संपूर्ण गावात पाईपलाईन ६६ लक्ष १२ हजार, जिल्हा परिषद अंतर्गत ८ लक्ष ५० हजार व १५ व्या वित्त आयोगाच्या निधितुन ॲरो प्लँट ६ लक्ष ५० हजार असे सुमारे पाऊण कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार लहु कानडे यांच्या हस्ते करण्यात आला.




      त्यावेळी गंगापूरचे सरपंच सतीश खांडके, चिंचोलीचे सरपंच गणेश हारदे, पिंपळगावचे सरपंच रामा वडीतके, गंगापूर सोसायटीचे चेअरमन लक्ष्मण कोळेकर, गंगापूर तंटामुक्ती अध्यक्ष बाबासाहेब साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य कैलास वर्पे, माजी सरपंच कारभारी पाटील, गोरख नांनोर, सूर्यभान भुजबळ, रेवन्नाथ भुजबळ, मनोज भुजबळ, बाळा भुजबळ, शाकीर भाई शेख, राजेंद्र तोरे, श्याम नान्नोर, नाथाभाऊ शिंदे, ग्रामसेवक रूपाली निर्मळ, अक्षय सावंत, प्रभाकर कातोरे, सोमा शिंदे, अंमळनेरचे माजी सरपंच रोहन जाधव, ठेकेदार कांदळकर साहेब व गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते. त्यावेळी आ. लहु कानडे साहेब यांनी माळेवाडी गंगापूर रस्ता मंजुर करण्यासाठी शब्द दिला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत