नगर जिल्ह्यातील 'या' लोकप्रतिनिधीची राहुरी कृषी विद्यापीठ राहुरीच्या कार्यकारी परिषदेवर निवड - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

नगर जिल्ह्यातील 'या' लोकप्रतिनिधीची राहुरी कृषी विद्यापीठ राहुरीच्या कार्यकारी परिषदेवर निवड

पाथर्डी (वेबटीम)  राज्यात अग्रगण्य असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी च्या कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्र विधानसभेच्या प्रतिनिधी म्ह...

पाथर्डी (वेबटीम)



 राज्यात अग्रगण्य असलेल्या महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी च्या कार्यकारी परिषदेवर महाराष्ट्र विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून आमदार मोनिका राजळे यांची महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी निवड केली आहे.


 राहुरी कृषी विद्यापीठाच्या सिनेट मेंबर म्हणून निवड झाल्याचे पत्र आज त्यांना प्राप्त झाले. कृषी विद्यापीठाच्या सिनेट मेंबर म्हणून निवड केल्याबद्दल त्यांनी विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर व भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले. कृषी विद्यापीठाच्या सिनेट मेंबर पदावर काम करतांना कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून कृषी संशोधन, नवीन कृषी तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांदापर्यंत नेवून शेती उत्पादनात गुणवत्ता व वाढ होण्याच्या दृष्टीने चांगले काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.



 ही निवड माझ्या शेतकरी, कष्ठकरी बांधवांसाठी कल्याणकारी होण्यासाठी मी निश्चीत काम करील, असे त्यांनी यावेळी सांगितले. माजी आमदार स्व. राजीव राजळे यांची सुध्दा राहुरी कृषी विद्यापीठाचे सिनेट मेंबर म्हणून नियुक्ती यापूर्वी झाली होती.



 आज त्याची पुनरावृत्ती होवून विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून मोनिका राजळे राहुरी कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी काम करणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत