संगमनेर, कोपरगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

संगमनेर, कोपरगाव येथे शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

  संगमनेर,कोपरगाव(वेबटीम) गेल्या चार दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची नवीन कार्यकारि...

 संगमनेर,कोपरगाव(वेबटीम)


गेल्या चार दिवसांपूर्वी शिवसेनेचे मुखपत्र दैनिक 'सामना'मधून उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची नवीन कार्यकारिणी जाहीर झाली होती. त्या कार्यकारणीस स्थगिती देण्यासाठी जिल्हाप्रमुख   रावसाहेब खेवरे प्रयत्न  केलेल असून नगर जिल्ह्यातील ज्या पदाधिकाऱ्यांना पदे मिळाले नाही, त्यांना भडविण्याचे काम करून  सदर नियुक्ती विरोधात काही ठिकाणी आंदोलन करण्यास सांगितल्याचा आरोप कोपरगाव व संगमनेर येथील शिवसैनिकांनी करत  संतप्त होवून जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे हटाव अन शिवसेना बचाव हे आंदोलन करून केले आहे. यावेळी जिल्हाप्रमुख खेवरे यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे शिवसैनिकांनी दहन  केले तसेच जोडे मारून निषेध केला.


 खेवरे यांच्या विरोधात संगमनेर व कोपरगाव येथे हे आंदोलन झाले. सदर आंदोलनात शिवसैनिकांनी घोषणाबाजी केली व 'खेवरे हटाव, शिवसेना बचाव' अशा घोषणा देखील देण्यात आल्या.



तसेच पै.रावसाहेब खेवरे यांच्या पुतळ्याचे दहन करून शिवसैनिकांनी रोष व्यक्त केला.संगमनेर व कोपरगाव येथे यावेळी मोठ्या संख्यने शिवसैनिक उपस्थित होते.





दरम्यान शिवसेना जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांची प्रतिमा मलिन करणाऱ्या संगमनेर येथील शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत