बसपाचे ०९ नोव्हेंबरला राज्यस्तरीय संमेलन - प्रकाश अहिरे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बसपाचे ०९ नोव्हेंबरला राज्यस्तरीय संमेलन - प्रकाश अहिरे

  श्रीरामपूर(वेबटीम)  बहुजन समाज पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व कार्यापद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाध्यक्षा ...

  श्रीरामपूर(वेबटीम)



 बहुजन समाज पार्टीच्या वतीने कार्यकर्त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी व कार्यापद्धतीबाबत मार्गदर्शन करण्यासाठी पक्षाध्यक्षा मायावती यांच्या आदेशाने पक्षाचे नॅशनल कॉर्डिनेटर आकाश आनंद यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली दि. ०९ नोव्हेंबर २०२२ रोजी मुंबई येथील षण्मुखानंद सभागृह, माटुंगा पूर्व येथे राज्यस्तरीय संमेलनाचे आयोजन केले असल्याची माहिती शिर्डी लोकसभा प्रभारी प्रकाश अहिरे यांनी दिली.

     या संमेलनाला जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी व नागरिकांनी उपस्थित राहण्यासाठी अहिरे व त्यांचे सहकारी शिर्डी लोकसभा कार्यक्षेत्रातील विविध तालुक्यामध्ये जनजागृती दौरा करून आवाहन करीत आहेत. श्रीरामपूर, संगमनेर, अकोले, कोपरगाव, राहता, नेवासा आदी तालुक्यातील पक्षाच्या कार्यकर्त्यांशी चर्चा, विचार विनिमय करून नियोजन करण्यात येत आहे. 

     या संमेलनाचे घोषवाक्य 'शासनकर्ते बना'  असून त्यानुसार उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून ऊर्जानिर्माण करण्याचे काम करण्यात येणार आहे. पुढील होऊ घातलेल्या निवडणूकाबाबत आढावा घेऊन पक्षासाठी केलेल्या व सामाजिक कामामधून सर्व सामान्यांना नेहमी न्याय देण्याच्या उद्देशाने नेहमी सक्रीय असलेले जिल्ह्यातील प्रत्येक पदाधिकाऱ्यांना महत्वाच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता कार्यकर्त्यांना तात्काळ कामास लागून पदाधिकार्यांच्या मागे सर्वांनी एक जुटीने उभे राहून पक्ष वाढीसाठी प्रयत्न होणे अत्यंत गरजेचे आहे. असे श्री. अहिरे यांनी सांगितले. 

       संमेलनाला केंद्रीय कॉर्डिनेटर खा. अशोकजी सिद्धार्थ, नितीनजी सिंह, महाराष्ट्र राज्य अध्यक्ष अँड संदीपजी ताजने, प. महाराष्ट्र झोन प्रभारी काळूराम चौधरी यांची उपस्थिती असून त्यांच्याही मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे अहमदनगर उत्तर शिर्डी लोकसभा कार्यक्षेत्रातून जास्तीत जास्त कार्यकर्त्यांनी या संमेलनाला उपस्थित राहावे असे आवाहन बसपाचे  शिर्डी लोकसभा प्रभारी प्रकाश अहिरे  यांनी केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत