शिवचरित्रकार हसन सय्यद यांना "नरवीर तानाजी" पुरस्कार - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

शिवचरित्रकार हसन सय्यद यांना "नरवीर तानाजी" पुरस्कार

  राहुरी(वेबटीम) शिवचरित्रकार हसन सय्यद यांना "नरवीर तानाजी" पुरस्कार तर तानाजी मालुसरे यांचे थेट बारावे वंशज डॉ. शीतल शिवराज मालु...

 राहुरी(वेबटीम)


शिवचरित्रकार हसन सय्यद यांना "नरवीर तानाजी" पुरस्कार तर तानाजी मालुसरे यांचे थेट बारावे वंशज डॉ. शीतल शिवराज मालुसरे यांना "झाशीची राणी" पुरस्काराने मुंबई येथील सामाजिक स्वीट होम ट्रस्टच्या वतीने रविवार दि. ०६ नोव्हेंबर २०२२ रोजी मराठा साहित्य संस्कृती कला मंडळ, सभागृह वाशी, सेक्टर क्र.०६ - नवी मुंबई येथे दु. १२ वा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हा भव्य सोहळा पार पडणार असून या सोहळ्याला साहित्य, कला, नृत्य, लेखन, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील विविध मान्यवर उपस्थित राहणार आहे, अशी माहिती सामाजिक स्वीट होम ट्रस्टचे संस्थापक सौ. प्रतिभाताई मोरे यांनी प्रसार माध्यमांना दिली.






  महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध शिवव्याख्येते राहूरीचे भूमिपुत्र शिवचरित्रकार हसन सय्यद यांची प्रबोधन क्षेत्रातील संघर्षमय घोडदौड पहाता व महाराष्ट्रभर शिवाजी महाराज व महापुरुषांचे कार्याचे प्रबोधनात्म विचार हे समाज घटकापर्यंत घेऊन जाण्याचे महान कार्य ज्याच्यातून सर्व समाज ऐक्याचे व सलोख्याचे दर्शन होते. हे महान आदर्शवंत कार्य म्हणून त्यांचे कौतुक करून त्यांना प्रेरणा मिळावी या हेतूने मुंबई येथील सामाजिक संस्थेने त्यांच्या कार्याची दखल घेत. महाराष्ट्राचे ऊर्जास्रोत शिवाजी महाराजांचे निष्ठवंत मावळा नरवीर तानाजी मालुसरे यांच्या नावाने हा पुरस्कार मुंबई येथे वाशी मध्ये देऊन त्यांना गौरविले जाणार आहे. 



पुरस्कार झाल्याने शिवचरित्रकार हसन सय्यद यांच्या असंख्य मित्र, परिवार, नातेवाईक व महाराष्ट्रभरातून मित्रांचे त्यांना भ्रमणध्वनीच्या माध्यमातून शुभेच्छा प्राप्त होत आहे. 

  तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांचे थेट बारावे वंशज डॉ. शीतल शिवराज मालुसरे यांनाही झाशीची राणी या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत