राहुरी फॅक्टरी(वेबटीम) स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी गणेश यशवंत रिंगे पाटील यांची तर राहुरी तालुका उपध्यक्ष पदी शुभ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या जिल्हा संपर्क प्रमुखपदी गणेश यशवंत रिंगे पाटील यांची तर राहुरी तालुका उपध्यक्ष पदी शुभम धनंजय गोसावी यांची निवड जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे यांनी केली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेत शेतकऱ्यांच्या लढ्यासाठी शेतकरी पुत्रांनी पुढाकार घेतला पाहिजे. राहुरी तालुक्यातील महाडूक सेंटर येथिल गणेश यशवंत रिंगे यांची जिल्हा संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आल्याची घोषणा करुन निवडीचे पत्र देण्यात आले. मोरवाडी येथिल शुभम धनंजय गोसावी यांची राहुरी तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. निवडीचे पत्र जिल्हाध्यक्ष रविंद्र मोरे तसेच जिल्हा सचिव जुगलकुमार गोसावी यांच्या हस्ते देण्यात आले. जिल्हाध्यक्ष मोरे यांनी यावेळी भविष्यात शेतकऱ्यांना संघटीत करून त्यांच्या न्याय हक्कासाठी निश्चित लढा उभारतील ही अपेक्षा व्यक्त करुन स्वाभिमानी शेतकरी संघटना राजकारणापेक्षा न्याय हक्कासाठी लढणारी संघटना असल्याने राजकारण संघटनेच्या बाहेर ठेवून संघटनेची जबादारी स्वीकारली आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत