स्वातंत्र्य, समता, बंधुतासाठी संविधानाची पारायणे व्हावीत: रोशन पाटील - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

स्वातंत्र्य, समता, बंधुतासाठी संविधानाची पारायणे व्हावीत: रोशन पाटील

राहुरी शहर(वेबटीम)  भारतीय संविधानातील जीवनमूल्ये आणि त्यामधील हक्क अधिकार या विषयावर विचार व्यक्त करताना शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष व यु...

राहुरी शहर(वेबटीम)



 भारतीय संविधानातील जीवनमूल्ये आणि त्यामधील हक्क अधिकार या विषयावर विचार व्यक्त करताना शिवराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष व युवा प्रबोधनकार रोशन पाटील म्हणाले की, भारतीय संविधान स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जीवनमूल्ये सर्वांना प्रदान करतो. संविधानातून बहुजनांना हक्क, अधिकार सहजासहजी मिळालेले नाही. संविधानाविषयी जागृती होण्यासाठी संविधानाची पारायणे झाली पाहिजे. व्यक्तिविकास, पर्यायाने राष्ट्रविकास करावयाचा असल्यास संविधानानुसार सर्वांनी वाटचाल करावी. त्याशिवाय दुसरा मार्ग नाही, असे प्रतिपादन पाटील यांनी केले. 


  यावेळी मौलाना अस्लम म्हणाले की संविधान निर्मात्यांनी सर्व धर्मीयांसाठी हक्क अधिकार बहाल केले. म्हणून देशात सर्व धर्मीय एकत्रित गुण्यागोविंदाने राहत आहेत देशाचे संविधान काही लोकांना बदलायचे असून या षड्यंत्राच्या विरोधात सर्वांनी एकत्र येत समतेचा आवाज बुलंद करायला हवा. संविधान दिन व राष्ट्रपिता महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मृतिदिना निमित्त संविधान दिन उत्सव समितीच्या वतीने जाहीर व्याख्यानाचे आयोजन राहुरी शहरातील नवी पेठ येथे करण्यात आले होते. 


कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जालिंदर घिगे यांनी केले. यावेळी प्रा. संदिप कोकाटे यांनी संविधानाच्या उद्देशिकेचे  वाचन केले. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सत्येंद्र तेलतुंबडे होते. याप्रसंगी कांतीलाल जगधने, कुमार भिंगारे, विक्की कदम यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन संचालन संजय संसारे यांनी केले. विचारमंचावर शिरीष गायकवाड, समतादूत एजाज पिरजादे उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महेश साळवे, संदीप कोकाटे, भूषण साळवे, प्रतीक रूपटक्के,डॉ. रमेश गायकवाड, जिशान शेख, शुभम धाडगे आदींनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत