राहुरी(वेबटीम) राहुरी शहरासाठी प्रस्तावित भुयारी गटार योजनेसाठी १३२ कोटी रुपये मंजूर झाल्याची तांत्रिक मान्यता मिळाल्याचे रावसाहेब चाचा तन...
राहुरी(वेबटीम)
राहुरी शहरासाठी प्रस्तावित भुयारी गटार योजनेसाठी १३२ कोटी रुपये मंजूर झाल्याची तांत्रिक मान्यता मिळाल्याचे रावसाहेब चाचा तनपुरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. दरम्यान ते पुढे म्हणाले की, राहुरी शहरात नामदार राधाकृष्ण विखे यांचा जाहीर नागरी सत्कार आयोजित केला होता.
त्या सत्कार कार्यक्रमाच्या वेळेस त्यांनी राहुरीकरांना शब्द दिला होता की, जी प्रलंबित कामे आहेत. त्यासाठी माझे प्रयत्न राहतील आणि त्यातच राहुरी नगरपरिषदेचे भुयारी गटारी योजना ही मंजूर होण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले व आज खऱ्या अर्थाने त्याला तांत्रिक मान्यता मिळाल्यामुळे राहुरीकरांसाठी ही अतिशय आनंदाची बाब आहे.
निश्चितच यामुळे राहुरीकरांना खरोखर राहुरीचा विकास झाल्याचे अनुभवायला मिळणार असून या योजनेमुळे नागरिकांचे सर्व प्रलंबित प्रश्न सुटणार आहेत. दरम्यान नामदार राधाकृष्ण विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले व खासदार सुजय विखे यांच्या विशेष प्रयत्नातून ही तांत्रिक मान्यता मिळाल्याचे चाचा तनपुरे यांनी सांगितले.
सदर योजनेचा आढावा वेळोवेळी आमदार राधाकृष्ण विखे यांनी घेतला होता. या भुयारी गटारी योजनेचा डीपीआर बनवण्याचे काम औरंगाबाद येथील संजय जोशी यांच्याकडे देण्यात आले होते. शासन दरबारी या योजनेचे तांत्रिक मानण्यासाठी कार्यकारी अभियंता अधीक्षक अभियंता श्रीमती सुनंदा नरवडे व नाशिक विभागाचे मुख्य अभियंता सुभाष भुजबळ तसेच मुंबई येथील सदस्य सचिव अभिषेक कृष्णा या अधिकाऱ्यांकडे सातत्याने याचा पाठपुरावा करून या योजनेला तांत्रिक मान्यता मिळाली आहे.
या योजनेसाठी रावसाहेब चाचा तनपुरे यांनी सतत तीन महिने पाठपुरावा करून ही योजना अमलात आणण्याचे श्रेय त्यांना आज मिळाले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे याची फी एक कोटी एकतीस लक्ष होती. परंतु जोपर्यंत फी भरण्यात येणार नव्हती. तोपर्यंत मान्यता मिळत नव्हती.
यामध्ये नामदार राधाकृष्ण विखे यांनी पुढाकार घेऊन सरकारकडून या योजनेसाठी समान पाच हप्ते पाडून एक वर्षासाठी भरण्याची मुदत मागून घेतली व आता नगर परिषदेने त्यामध्ये वीस लाख रुपये भरले असून ही योजना आता अस्तित्वात येणार आहे. या योजनेसाठी विशेष प्रयत्न रावसाहेब चाचा तनपुरे यांनी नामदार राधाकृष्ण विखे, माजी मंत्री शिवाजी कर्डिले, खासदार सुजय विखे यांच्या माध्यमातून केले असून यामुळे राहुरी शहरवासीयांकडून यांचे आभार मानण्यात येत आहे.
यावेळी रावसाहेब (चाचा) तनपुरे, राजेंद्र उंडे, आर. आर. तनपुरे, डॉ. धनंजय मेहेत्रे, डॉ. भळकट, शिवाजी डौले, प्रदीप भुजाडी, भैय्यासाहेब शेळके, ऋषी तनपुरे, धीरज पानसंबळ, नयन सिंगी, सुभाष वराळे, सुनील पवार, नारायण धोंगडे, संदीप भोंगळ, नगरसेवक सोन्याबापू जगधने, सचिन मेहेत्रे, आतिक बागवान, भाऊसाहेब काकडे, उमेश शेळके, अरुण साळवे, अफनान आतार, बिलाल शेख, गणेश खैरे आदी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत