विवाहितेचा छळ, सासरच्या ५ लोकांवर गुन्हा दाखल - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

विवाहितेचा छळ, सासरच्या ५ लोकांवर गुन्हा दाखल

  राहुरी (प्रतिनिधी) माहेरहून हूंड्याचे पाच लाख रूपये आणावेत. या मागणीसाठी वृषाली विधाते या २८ वर्षीय विवाहित तरूणीचा तीच्या सासरच्या लोकांन...

 राहुरी (प्रतिनिधी)



माहेरहून हूंड्याचे पाच लाख रूपये आणावेत. या मागणीसाठी वृषाली विधाते या २८ वर्षीय विवाहित तरूणीचा तीच्या सासरच्या लोकांनी शारीरीक व मानसिक छळ केलाय. तसेच तीला मारहाण करून जिवे मारण्याची धमकी दिली. या बाबत सासरच्या पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. 






           वृषाली दत्तात्रय विधाते, वय २८ वर्षे, राहणार साडेसतरानळी, सर्वे नंबर २०३, गोगावले सुपर मार्केट जवळ, हडपसर, पुणे. हल्ली राहणार कोल्हार खुर्द, ता. राहुरी. या विवाहित तरूणीने राहुरी पोलिसात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे कि, वृषाली दत्तात्रय विधाते हिचे लग्न दिनांक २६ मे २०११ रोजी दत्तात्रय साहेबराव विधाते रा. ताहराबाद ता. राहुरी. याचे सोबत झाले होते. 






            वृषाली विधाते ही लग्नानंतर तीचा पती, सासू, सासरा व दिर यांच्या सोबत हडपसर, पुणे येथे राहत होती. लग्नानंतर तीच्या सासरच्या लोकांनी मला काही दिवस चांगले नांदवले. परंतु दोन वर्षानंतर तीचे सासरचे लोक तीला म्हणत की, तुझ्या आई वडीलांनी लग्नात आम्हाला चांगला मानपान दिला नाही, हुंडा पण दिलेला नाही. असे म्हणुन नेहमी शारिरीक व मानसिक छळ करु लागले. नंतर तीचे सासु सासरे तीला म्हणाले की, आपल्याला पुणे येथे घर घेण्यासाठी तुझ्या आई वडीलांकडुन पाच लाख रुपये घेऊन ये. सन २०१४ मध्ये तीच्या सासरच्या लोकांनी तीला शारिरीक व मानसिक त्रास देऊन मारहाण आणि माहेरी कोल्हार खुर्द येथे आणुन सोडले होते. त्यानंतर तीच्या आई वडीलांनी व सासरच्या लोकांनी सन २०२० मध्ये बैठक बसवुन तीला सासरी नांदायला घेऊन गेले. काही दिवस त्यांनी वृषाली हिला चांगले नांदवले.






 त्यानंतर परत तीचा हुंड्याच्या पैशासाठी शारिरीक व मानसिक छळ करु लागले. तेव्हा वृषालीचे वडील पुणे येथे गेले व त्यांनी तीच्या सासरच्या लोकांना सांगितले की, माझ्याकडे सध्या पैसे नाहीत मी पैसे आल्यानंतर तुम्हाला पैसे देईन. तेव्हा वृषालीच्या सासरचे लोक म्हणाले की, जोपर्यत तुम्ही हुंड्याचे पैसे देत नाही तो पर्यत तुमची मुलगी तुमच्याकडे राहु द्या. असे म्हणुन वृषालीच्या वडीलांना शिवीगाळ केली व म्हणाले की, तुमच्या मुलीला जिवंत पहायचे असेल तर आम्हाला पैसे द्यावे लागतील अशी धमकी दिली. त्यानंतर वृषाली हिला माहेरी कोल्हार खुर्द येथे आणुन सोडले. असे फिर्यादीत म्हटले आहे.







 वृषाली दत्तात्रय विधाते हिच्या फिर्यादीत काल राहुरी पोलिस ठाण्यात आरोपी १) दत्तात्रय साहेबराव विधाते, २) लता साहेबराव विधाते, ३) साहेबराव रंभाजी विधाते, ४) सागर साहेबराव विधाते, सर्व राहणार साडे सतरा नळी, सर्वे नंबर २०३, गोगावले सुपर मार्केट जवळ, हडपसर, पुणे. ५) रंजना देविदास भालेराव, राहणार वरवंडी, ता. राहुरी. या पाच जणांवर गुन्हा रजि. नं. १२३८/२०२२ भादंवि कलम ४९८ (अ), ३२३, ५०४, ५०६, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. 


           या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक डी. डी. कोकाटे हे करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत