पहिल्या प्रेमात झालेली चूक ह्या जन्मात भरून निघणार नाही - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

पहिल्या प्रेमात झालेली चूक ह्या जन्मात भरून निघणार नाही

अर्थातच माझा 1995/97 चा ग्रामीण खेडेगावातील काळ माझ्या त्या वेळेच्या काळानुसार एक तर प्रेम मुलगी घरापासून पाणी आणण्यासाठी किंवा धुण्यासाठी ज...



अर्थातच माझा 1995/97 चा ग्रामीण खेडेगावातील काळ माझ्या त्या वेळेच्या काळानुसार एक तर प्रेम मुलगी घरापासून पाणी आणण्यासाठी किंवा धुण्यासाठी जात असताना, हायस्कूलमध्ये नजर चुकीने दर्शन झाले असता किंवा घरचेच कोणीतरी नातेवाईकांनी माझी सून किंवा माझी नात सून होणार अशा शब्दामुळे ओढ लागायची. त्यातील माझा असाच एक प्रसंग म्हणजे आमच्या घरा समोरून रोजच पाणी आणण्याच्या हेतूने ये जा करत असताना माझ्या आजोबांकडून नकळत पहिल्या प्रेमातील मैत्रिणीचे 14/15 वय रनिंग असताना माझी नात सून असे म्हणून आजोबा काहीतरी छोटं मोठं काम सांगायचे नि त्यातूनच कुठेतरी त्या शब्दाचा मनात घर करून आमच्या प्रेमाची वाटचाल चालू झाली.14/15 वयातील मैत्रीण आणि मी तिच्यापेक्षा तीन वर्षांनी मोठा.

 पहिले एक-दोन वर्षे तर यातच गेले कि ती घरा पुढून जाते नी तिला घरातून बघतोय ती हातपंपाचं (हापशा) पाणी आणण्यासाठी जाते मी तिच्या मागे मागे काहीही घराची जबाबदारी नसतानाही पाणी आणण्यासाठी जायचो नेहमीप्रमाणे तिची जवळची मैत्रीण माझ्या घरापासून काही अंतरावर आमच्याच खळ्या शेजारी माझी नातेवाईक म्हणून  राहत होती. तिच्याकडे मोठे धाडस करून दोन वर्ष नेत्र सुख घेतल्यानंतर चिट्ठी पाठविण्याचे धाडस केले नी चिठ्ठी हातात पडताच नानांना किंवा आप्पांना (दोन्हीही चुलते - टोपण नाव)सांगेल नी तुला ते खूप मारतील असा दम वजा इशारा मैत्रिणीकडून मला उत्तरातून भेटला नि चिट्ठी परत माझी मलाच वाचावा लागली. सात आठ दिवस गेल्यानंतर एकामेकांच्या आकर्षणातील नेत्र सुखात काहीच बदल झाला नाही.


 म्हणून परत त्याच नातेवाईक मैत्रिणीकडे दुसरी चिठ्ठी पाठवलेली नी पहिल्या प्रेमातील मैत्रिणी ने  ति चिट्ठी स्वीकारली. नेहमीप्रमाणे अर्थातच ठराविक अंतराने चिट्ठी पाठवल्यानंतर भेटण्याची वेळही ठरली आणि सातत्याने रात्रीच्या वेळेस शौचालयाला जाते हे कारण सांगून नेहमीच आम्ही भेटत राहिलो. त्या परिस्थितीमध्ये मी बारावी झाल्यानंतर आयटीआय ला ऍडमिशन घेतले. भावांनो सुरुवातीचा भेटीगाठीचा काळ हा माझ्या घरापलीकडे असणाऱ्या खळ्यातच गेला. परस्थिती नुसार जसजशी ओढ लागत गेली तस तशा भेटीगाठी वाढत गेल्या आणि शेजारी राहत असलेल्या काही मित्रांनाही आमच्या भेटीगाठीचा सुगावा लागत गेला.

 भेट होण्यास अडचण निर्माण होत गेल्यामुळे नी कुठेच पर्यायी जागा नसल्यामुळे शेवटी आम्ही माझ्या खळ्या शेजारी असलेल्या स्मशानभूमीतच भेटण्याचा निर्णय घेतला. स्मशानभूमीतील त्या वास्तूलाही आम्ही भेटण्याच्या माध्यमातून सामोरे गेलो. हळूहळू हीच भेट मैत्रिणीच्या घरी लक्षात आल्यामुळे सुरुवातीला चुलत्यांनी राग व्यक्त करून समजावण्याचा  प्रयत्न केला परंतु मैत्रीण त्या ऐकण्याच्या अवस्थेत मुळीच नव्हती की तिने घरच्यांचे ऐकून काही स्वतःच्या स्वभावात बदल करावा आणि प्रेमात अंतर द्यावे घरची मुलगी कशीच ऐकत नाही म्हणून आईने काळजी पोटी धूप अंगारा करणाऱ्या बाबा कडून सप्तरंगी दोरा घालून घेतला.
तीच काहीशी माझी अवस्था होती.

पुढे बारावीनंतर आयटीआय मध्ये टर्नर सारखा चांगला ट्रेड घेतला असताना सुद्धा मशीन शॉप वरती मित्रांना विनंती करून जॉब करायला लावायचो नी मी  मशीनच्या खाली बसून प्रेमपत्र पाठविण्यासाठी लिखाण करीत बसायचो. पुढे आयटीआय पास झाल्यानंतर शिकावू उमेदवार म्हणून अप्रेंटिस साठी कंपनीमध्ये जॉईन झालो नी त्यावेळेस मैत्रिणीचे ही अठरा वर्षे वय पूर्ण झाल्यामुळे घरचे लग्नासाठी चर्चा करू लागले. गावात तिच्या मैत्रिणीच्या घरी लँडलाईन फोन असल्यामुळे त्यावरूनच ती सातत्याने मला कंपनीमध्ये फोन करून घरी लग्नाची चालू झालेली चर्चा सांगू लागली. नकळत त्याच परिस्थितीमध्ये मैत्रीण आणि माझी गावात आल्यानंतर चर्चा होत असताना माझ्या आईने मला दोन-तीन वेळेस बोलताना बघितले नी माझ्या आईची माझ्या या प्रेमाच्या वाटचालीस पूर्णतः नकारात्मक विचारधारा तयार झाली. नी त्यावेळेस नेहमीच मुलगा वडिलांचा ऐकत नसेल तर तुझ्या मामांना सांगेन असा एक दबाव गट तयार केला जायचा नी काहीसा तसाच दबाव गट वेळोवेळी माझ्या आईने माझ्या वर तयार केला आणि मी निर्णय घेण्याच्या अगोदरच द्विधा  मनस्थिती मध्ये गेलो नी मैत्रिणीला काहीही स्पष्ट उत्तर न देता वेळ मारून नेऊ लागलो अशातच मैत्रिणीला तिच्या घरच्यांनी माझ्या नी माझ्या घरच्यांच्या त्यातल्या त्यात आईच्या स्वभावाबद्दल समजून सांगून समजूत काढली नी पाहुण्यांची ये जा सुरू झाली व तिचे एका नातेवाईकाच्या इथे पसंती झाल्यामुळे जमले. प्रेमात कधीच फायदा तोट्याचा जवळचा लांबचा विचार ना मी केला ना तिने केला त्यामुळे तिचे लग्न जमले तरी सातत्याने आम्ही दोघे प्रेमाच्या माध्यमातून एकमेकाच्या सहवासात टिकून राहिलो तिच्या मोठ्या बहिणीचे लग्न गावात झाले असल्यामुळे व ती माझ्या भाऊबंदाच्या घरात दिलेली असल्याकारणाने बऱ्याच वेळा माझ्या खळ्याशेजारील तिच्या बहिणीच्या मालकीच्या गाईंच्या सपराच्या खोलीमध्ये आम्ही नंतरही भेटत राहिलो. तेही तिच्या बहिणीने बघितल्यामुळे भरपूर आरडाओरडा करून समज दिली परंतु नातेवाईकांचे ऐकून प्रेम करायचे थांबवणे ते प्रेम कसले ? हळूहळू लग्नाची तारीख जवळ आली नी ज्या मुलासंगे मैत्रिणीचे जमले होते ते रूढीपरंपरेना हळदीच्या दिवशी न येता सरळ लग्न तारखेलाच सकाळी गावात येणार होते. अशी माझ्या मैत्रीनीची परिस्थिती असताना सुद्धा ती हळद लावलेल्या अंगावर हातात हिरवा चुडा घातलेला असताना सुद्धा हळदीच्या दिवशी म्हणजेच लग्नाच्या एक दिवस आधी रात्री मला भेटायला अंधारामध्ये आली ही तिची माझ्याबद्दलची असणारी ओढ. मलाही तिच्या लग्नाच्या दिवशी घरी समज दिलेली असल्याकारणाने मी गावबाहेर निघून गेलो व दिवसभर ड्रिंक्स केली. मी रात्री घरी आलो नी दुसऱ्या दिवसाची सकाळ उजाडताच लहान मुलासारखे हंबरडा फोडून आई-वडील,आजी आजोबा यांच्यासमोर  मोठमोठ्याने रडू लागलो. लग्नाच्या एक दीड महिन्यानंतर मैत्रिणीने तिच्या भावाला निरोप दिला की मला  त्याला म्हणजे मला बघण्याची अतूट इच्छा झालेली आहे तरी तू त्याला घेऊन माझ्या नवीन घरी ये नाहीतर मी घरीच येईल असा निरोप आल्यामुळे तिचा भाऊ सुद्धा एक दिवस नकळत मला तिच्या घरी घेऊन गेला व साक्षी -  मारक तिच्या नवीन घरी जाऊन पोहे खाऊन परत घरी आलो. त्यानंतर आमच्या दोघांच्या सहवासात अंतर पडत गेले व दोन वर्षानंतर माझेही जमले. माझे जमल्याचा तिला निरोप भेटताच ती माहेरी म्हणून घरी आली व मला भेटण्यासाठी रात्रीच्या वेळेस बोलावले व मी भेटण्यासाठी गेलो असता तिने डायरेकच माझी कॉलर पकडली व खूप राग व्यक्त केला की तू लग्न करायचे नाही तर मी तिला समजून सांगितले की तुझे आता लग्न झालेले आहे माझेही लग्न होणारच होते -  त्यावर तिने उत्तर दिले की माझे लग्न झाले हे माझ्या आई-वडिलांच्या इच्छेनुसार परंतु माझ्या सहवासाशिवाय तुझ्या आयुष्यात कोणत्याच व्यक्तीने येऊ नये असे माझे मत आहे असे म्हणून राग-राग व्यक्त करून निघून गेली आणि आमचे कायमचेच प्रेमातीलअंतर पडले. नवीन नात्यानुसार एकमेकांची ओढ ही कमी होत गेली. भावांनो आज माझे 42 वय झाले आहे नी आमच्या प्रेमात नकळत का होईना वीस वर्षानंतर ती दिवाळीनिमित्त माझी भावजय म्हणजे तिच्या मोठ्या बहिणीच्या घरी शेजारी राहत असल्यामुळे दिवाळीला आली नी तिला बघतोच राहिलो परंतु तिची नजर बघता मला तिच्या मनात माझ्याविषयी राग आहे की कुतूहल हे लक्षात आले नाही त्यामुळे मी बराच विचार करून मला त्यावेळेस शेतात रात्रीची लाईट असल्यामुळे मी शेतातून रात्री घरी आल्यानंतर जेमतेम रात्रीचे तीन वाजता तिला सहजच विचारपूस करण्याच्या माध्यमातून चिठ्ठी लिहिली आणि माझा मोबाईल नंबर ही दिला. फोन येईलच अशी साशंकता नसल्यामुळे मी जास्त मनावर घेतले नाही परंतु तीन महिन्यानंतर तिचा माझी विचारपूस करण्याच्या माध्यमातून फोन आला नी आज तागायत उरलेल्या आयुष्यात कोणताही स्वार्थ न ठेवता फक्त विचार जुळतात म्हणून पहिल्या प्रेमाच्या नावाखाली बोलण्याचीच नशा म्हणून आम्ही एकमेकांचे विचार शेअर करीत आहोत. माझ्या मैत्रिणीने माझ्यावर माझ्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त प्रेम केले होते हे मी या जन्मात कधीही विसरू शकत नाही नी माझ्या आयुष्यातील मी 42 वर्षाच्या वयामध्ये माझ्या मैत्रिणीला लग्नाच्या बाबतीत गांभीर्याने घेतले नाही ही चूक मी माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी चूक झाली म्हणून रोजच मान्य करून मनातल्या मनात स्वतःला खातो. माझ्या मैत्रिणीने माझ्यासाठी आयुष्यात जे काही सोसले त्याबद्दल दिर्गिरी व्यक्त करतो नी माझ्यामुळे तिच्या आयुष्यात जो काही त्रास (harassment) झाला त्याबद्दल मी दैवताला कायमच एकच विनंती करतो की तिला झालेल्या दुःखाबद्दल मला नेहमी कर्ता करवित्याने शिक्षा द्यावी व ती भोगण्यास मी मनापासून तयार आहे. या जन्मी तरी झालेल्या चुकीच शल्य मला माझ्या नावाचे दशक्रिया विधीला  तीळ वाहे पर्यंत आयुष्यात कायमच राहणार आहे.अर्थात माझ्याही कुटुंबाची पूर्ण जबाबदारी स्वीकारून 🙏
जीवापाड प्रेम करणाऱ्या मैत्रिणीला कधीच अंतर देऊ नका. अशा व्यक्तीचे प्रेम हलकेफुलके न घेता/ समजता निर्णय घेण्याचे धाडस अंगात ठेवा . पहिल्या प्रेमात झालेली चूक या जन्मात नक्कीच भरून निघणार नाही हेही तेवढेच खरे 🙏
वेळ मारूपणा करून योग्य वेळी पहिल्या प्रेमाच्या माध्यमातून लग्नाचा निर्णय न घेणारा नी  उरलेल्या आयुष्यात झालेल्या चुकीबद्दल कायमच मनाला खाणारा ....
किरण 🙏

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत