राहुरी फॅक्टरी(वेबटीम):- 'जागतिक दिव्यांग दिन'- ३ डिसेंबरच्या धर्तीवर दि.३ डिसेंबर ते ९ डिसेंबर हा शासनामार्फत जागतिक दिव्यांग सप्त...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम):-
'जागतिक दिव्यांग दिन'- ३ डिसेंबरच्या धर्तीवर दि.३ डिसेंबर ते ९ डिसेंबर हा शासनामार्फत जागतिक दिव्यांग सप्ताह आयोजित केला आहे.त्याअनुषंगाने शिवाजी प्राथमिक विद्यालय,श्रीशिवाजीनगर,या शाळेच्या वतीने वक्तृत्व स्पर्धा,चित्रकला स्पर्धा,परिसरातील दिव्यांग यांचा सन्मान,समुपदेशन असे अनेक कार्यक्रम आयोजित केले आहे.
त्यात आज सकाळी राहुरी फॅक्टरी परिसरात इयत्ता १ ली ते ४ थी च्या चिमुकल्यांनी प्रभात फेरी काढून शिस्तबद्ध संचलनात घोषणा देऊन जनजागृती केली.त्यात संदेश पर " एक हात मदतीचा-साथ सोबतीचा " ,
" दिव्यांगांचा सन्मान-हाच आमचा अभिमान "
" हक्क देऊ,संधी देऊ-दिव्यांगांना प्रोत्साहन देऊ "
अशा आकृतीबद्ध पाट्या बनवून जनसामान्यांचे लक्ष वेधले.दिव्यांग आज सर्वच क्षेत्रात नैपुण्य संपादीत करत असल्याने समाजाने त्यांना मानवतावादी समानतेच्या तत्वावर सहकार्य केले पाहिजे.अशी अपेक्षा बाळगून हा स्तुत्य उपक्रम शाळेमार्फत आज पार पडला.यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका मा.श्रीमती.आवारे मॅडम,देशमुख सर,जाधव के.के.सर,सोनवणे सर,राशीनकर सर,जाधव ए. के.सर,थोरात सर,कोहकडे मॅडम,सुपनर मॅडम,साबळे मॅडम,डांगे मॅडम,शिंदे मॅडम,ढेसले मामा व सर्व विद्यार्थी यांचे योगदान महत्वाचे ठरले...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत