डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयात शालेय गणित विज्ञान प्रदर्शन व बाल आनंद मेळावा संपन्न .... - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

डॉ.सी.एम.मेहता कन्या विद्यालयात शालेय गणित विज्ञान प्रदर्शन व बाल आनंद मेळावा संपन्न ....

कोपरगाव(युसूफ रंगरेंज) कोपरगाव येथील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात शालेय विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी नुकत...

कोपरगाव(युसूफ रंगरेंज)



कोपरगाव येथील डॉ. सी. एम. मेहता कन्या विद्यालयात शालेय विद्यार्थिनींमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण होण्यासाठी नुकतेच शालेय गणित विज्ञान प्रदर्शन व बाल आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता.


   या प्रदर्शनाचे उदघाटन रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य संदीप वर्पे, धरम बागरेचा, गटशिक्षणाधिकारी शबाना शेख ,के. बी. पी. माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक  सुरेश कातकडे, विद्यालयाच्या प्राचार्या मंजुषा सुरवसे , उपमुख्याध्यापक रावसाहेब शिंदे , पर्यवेक्षक सुरेश सोनवणे , मेहबूब शेख,आदी मान्यवरांच्या उपस्थितीत  करण्यात आले. 



याप्रसंगी आपले मनोगत व्यक्त करताना रयत शिक्षण संस्थेचे जनरल बॉडी सदस्य संदीप वर्पे यांनी विज्ञानाचे महत्त्व सांगून या प्रदर्शनाच्या माध्यमातून भविष्यातील वैज्ञानिक तयार होण्यास प्रेरणा मिळते असे मौलिक विचार मांडले. मुख्याध्यापक सुरेश कातकडे यांनी विज्ञान व गणित प्रदर्शनाचे महत्त्व सांगताना थोर शास्त्रज्ञ तुमच्यामधूनच घडले जातात असे सांगितले .विज्ञान प्रदर्शनात विद्यालयातील विद्यार्थिनींनी विज्ञानाची सुमारे 150 व गणिताची सुमारे 100 उपकरणे ,तक्ते ,मॉडेल मांडले होते. उपस्थित पाहुण्यांनी प्रदर्शनाला भेट देताना विद्यार्थिनींबरोबर हितगुज केले. 

तसेच  बाल आनंद मेळाव्यात विविध पदार्थांची विक्री यामधून निश्चितच व्यवहार ज्ञान प्राप्त होईल या व्यवहार ज्ञानाचा त्यांना भविष्यात फायदा होऊन मोठे व्यावसायिक दुकानदार होतील असे सांगितले. मेळाव्यात विद्यार्थिनींनी विविध खाद्यपदार्थ व फळे  विक्री


साठी आणले होते . विद्यालयातील इयत्ता आठवी व नववी वर्गातील  विद्यार्थिनींनी सुमारे शंभर स्टॉल लावले होते. विद्यालयातील विद्यार्थिनी व शिक्षक यांनी स्टॉलवरून विविध खाद्यपदार्थ फळे खरेदी करून चांगला प्रतिसाद दिला.  प्रदर्शन यशस्वी होण्यासाठी विज्ञान प्रदर्शन प्रमुख नंदा बढे,प्रवीण बोराडे, भारती गागरे ,सुनिता वाबळे, विना चौधरी, पांचाली ताकवले, रुपाली शिंदे ,रेखा पवार, वेनूगोपाल अकलोड, ज्योती गायकवाड, गीतांजली गायकवाड ,सविता साबळे ,मनीषा कोकणी व विद्यालयातील शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किरण चांदगुडे  व आभार प्रदर्शन प्रवीण निळकंठ यांनी केले.                          

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत