राहुरी फॅक्टरी येथे उद्या सोमवारी दि राहुरी अर्बन क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथे उद्या सोमवारी दि राहुरी अर्बन क्रेडिट सोसायटीचे उद्घाटन

  राहुरी फॅक्टरी(वेबटीम) राहुरी फॅक्टरी येथील दि राहुरी अर्बन क्रेडीड को-ऑफ सोसायटी संस्थेचा उद्या सोमवार दि ५ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाज...

 राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



राहुरी फॅक्टरी येथील दि राहुरी अर्बन क्रेडीड को-ऑफ सोसायटी संस्थेचा उद्या सोमवार दि ५ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजता महंत उद्धव महाराज  मंडलिक यांच्या हस्ते संपन्न होणार आहे.


 ग्राहकांच्या विश्वासास पात्र ठरलेली राहुरी अर्बन निधी संस्थेचा वर्धापनदिन उद्या सोमवारी साजरा होत असतानाच दि राहुरी अर्बन क्रेडीट को-ऑफ सोसायटी संस्थेचा शुभारंभ नगर-मनमाड मार्गावरील डॉ.वामन हॉस्पिटल शेजारील श्री.साई कॉम्प्लेक्स येथे  महंत उद्धव महाराज यांच्या हस्ते तर प्रेरणा उद्योग समूहाचे अध्यक्ष सुरेश वाबळे व जिल्हा उपनिबंधक गणेश पुरी यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार .

 या कार्यक्रमास तहसीलदार एफ.आर.शेख, पोलीस निरीक्षक प्रताप दराडे, सहा.निबंधक दीपक नागरगोजे, साई आदर्श मल्टीस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, आदर्श नागरी पतसंस्थेचे चेअरमन अण्णासाहेब चोथे, उद्योजक यमनाजी आघाव, उद्योजक विष्णूपंत गीते, डॉक्टर केमिस्ट पतसंस्थेचे चेअरमन डॉ.विलास पाटील, आंतराष्ट्रीय खेळाडू व प्रहारचे श्रीरामपूर विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब ढुस,  कर्मवीर अकॅडमीचे मेजर राजेंद्र कडू आदी उपस्थित राहणार आहेत.


 या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन संस्थेचे संस्थापक चेअरमन रामचंद्र काळे, प्रशांत रामभाऊ काळे व संचालक मंडळ, अधिकारी-कर्मचारी वृंदानी केले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत