देवळाली प्रवरा/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील भालेकर वस्ती येथील श्रीदत्त मंदिरात बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी बाब...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील भालेकर वस्ती येथील श्रीदत्त मंदिरात बुधवार दिनांक ७ डिसेंबर रोजी सकाळी बाबनंद महाराज वीर यांचे प्रवचन पार पडले यानंतर माजी आ.चंद्रशेखर कदम व त्यांच्या सुविद्य पत्नी प्रियतमा कदम यांच्या हस्ते महाआरती संपन्न झाली त्यांनतर उपस्थित भाविकांना खिचडी प्रसादाचे वाटप कऱण्यात आले.
यावेळी युवा उद्योजक तथा अमोल कन्स्ट्रक्शनचे संचालक संदिप कदम,धनलक्ष्मी उद्योग समूहाचे अध्यक्ष विष्णुपंत गीते, भास्कर तांबे, रोहिदास महाराज सांगळे, आदींसह मान्यवर उपस्थित होते.दत्तजयंती निमित्त दिवसभर भाविकांची मोठी गर्दी होती.
उद्या गुरुवार ८ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता भागवत महाराज उंबरेकर यांचे काल्याचे किर्तन होऊन महाप्रसाद वाटपाने गुरुचरित्र पारायण सोहळा व सप्ताहाची सांगता होणार आहे.
तरी या कार्यक्रमास भाविकांनी उपस्थित राहावे असे आवाहन ज्ञानेश्वर भालेकर, अनिल भालेकर, गणेश भालेकर यांच्यासह आझाद मंडळाने केले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत