श्रीरामपूर (वेबटीम) बहुजन समाज पार्टी शिर्डी लोकसभेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्...
श्रीरामपूर (वेबटीम)
बहुजन समाज पार्टी शिर्डी लोकसभेच्या वतीने महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी मार्गदर्शन करताना शिर्डी लोकसभा प्रभारी प्रकाश अहिरे म्हणाले की, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री आणि बहुजनांचे कैवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे दिल्ली येथे ६ डिसेंबर १९५६ रोजी निधन झाले. त्यामुळे ६ डिसेंबर हा दिवस महापरिनिर्वाण दिन म्हणून साजरा केला जातो. नंतर काही वर्षांनी डॉ. आंबेडकरांच्या पवित्र अस्थीवर चैत्य उभारण्यात आले. डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या निधनाअगोदर त्यांनी १४ ऑक्टोबर १९५६ रोजी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माचा स्वीकार केला होता. त्यामुळे त्यांच्या पुण्यतिथीसाठी महापरिनिर्वाण हा बौद्ध संकल्पनेतील शब्द वापरण्यात आला आहे. भारताच्या इतिहासात बहुजन समाज आणि बौद्ध धर्मीयांसाठी आपलं जीवन वेचणाऱ्या डॉ. आंबेडकरांच्या स्मृतिस्थळाला भेट देण्यासाठी लाखोंचा जनसागर उसळतो. असे असे अहिरे यांनी सांगितले.
या प्रसंगी बहुजन समाज पार्टीचे श्रीरामपूर विधानसभा सचिव ताराचंद त्रिभुवन, सदस्य विशाल टेकाळे, विधानसभा उपाध्यक्ष कल्पनाताई त्रिभुवन, नामदेव शिंदे, शहर संघटक संजय सूर्यवंशी, शहर कोषाध्यक्षा मीनाताई सोनवणे, सदस्य विजय मटाले, शिरसगाव शाखाध्यक्ष मन्सूर शेख, भारत शिंगे, बेलापूर शाखाध्यक्ष बापू भगत आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत