राहुरी/वेबटीम:- राहुरी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांना शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्थ...
राहुरी/वेबटीम:-
राहुरी तालुका रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर गटाचे राहुरी तालुकाध्यक्ष प्रदीप मकासरे यांना शिवस्वराज्य बहुउद्देशीय संस्था यांच्यावतीने राज्यस्तरीय युवा भूषण पुरस्काराने नुकतेच सन्मानित कऱण्यात आले आहे.
प्रदीप मकासरे यांच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
यावेळी शेतकरी संघटनेचे जिल्हा संघटक भास्करराव तुवर, डॉ.शामराव काळे,डॉ.बाबासाहेब वाघमारे, भैरव वाघमारे, उदय वाघमारे, संस्थेचे संस्थापक अध्यक्ष संजय वाघमारे, सचिव सौ.रमाताई वाघमारे,पुणे येथील विधिज्ञ विकास वाघमारे,सचिन चक्रनारायण,विनोद शिंदे, ग्रामपंचायत सदस्य सुरज मकासरे,अतिश मकासरे,नितीन ब्राम्हणे आदी उपस्थित होते.
या पुरस्काराबद्दल आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष दिपक निकाळजे यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी प्रदिप मकासरे यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत