धुळे(वेबटीम) गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे बनावट दारू बनविण्याचा मिनी कारखा...
धुळे(वेबटीम)
गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे तालुका पोलीस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागातर्फे बनावट दारू बनविण्याचा मिनी कारखाना उद्ध्वस्त करण्यात आला आहे. विशेष म्हणजे राज्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रवरा डिस्टिलरी कंपनीचा वापर करून बनावट दारूचा सुरू असलेला धुळे येथील कारखाना पोलिसांनी उध्वस्त केला आहे.
गुजरात (Gujrat) निवडणुकीबरोबरच धुळ्यात देखील 128 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांची रणधुमाळी सध्या सुरू आहे. यातच धुळे तालुक्यातील कावठी शिवारामध्ये सर्रासपणे बनावट दारूचा कारखाना सुरू असल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग व धुळे तालुका पोलिसांना (Police) मिळाली होती. या माहितीच्या अनुषंगाने रात्रीच्या सुमारास पोलिसांनी हा बनावट दारूचा मिनी कारखाना उध्वस्त केला आहे.
कारवाईदरम्यान पोलिसांनी जवळपास एक कोटीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच महत्त्वाचे म्हणजे या कारवाईतील मुख्य आरोपी तेथील सरपंच महिलेचा पती असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे सरपंच महिलेच्या पतीकडूनच हा बनावट दारूचा कारखाना सुरू होता. पोलिसांनी या कारवाईदरम्यान दहा जणांवर गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी सात जणांच्या मुस्क्या पोलिसांनी आवळले असून यातील तिघा आरोपी सध्या फरार आहेत
कोणत्याही टिप्पण्या नाहीत