राहुरी फॅक्टरी(वेबटीम) तत्पर सेवा, स्वच्छता व गुणवत्ता हे हॉटेल साई समाधानचे खास वैशिष्ट्य असल्याचे प्रतिपादन माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी ...
राहुरी फॅक्टरी(वेबटीम)
तत्पर सेवा, स्वच्छता व गुणवत्ता हे हॉटेल साई समाधानचे खास वैशिष्ट्य असल्याचे प्रतिपादन माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी केले.
नगर-मनमाड मार्गावरील हॉटेल साई समाधान येथे सोमवारी माजी खा.प्रसाद तनपुरे यांनी सदिच्छा भेट देऊन भोजनाचा आस्वाद घेतला प्रसंगी ते बोलत होते.
यावेळी बोलताना माजी खा.तनपुरे म्हणाले की, हॉटेल व्यवसाय करीत असताना ग्राहकांना उत्तम सेवा देण्यावर भर देणे आवश्यक आहे. साई समाधानचे सर्वेसर्वा दत्तात्रय दरंदले व त्यांचा संपूर्ण स्टाफ याची पूर्ण काळजी घेत असल्याने शिर्डी-शिंगणापूर देवस्थानला येणाऱ्या भाविक व स्थानिक नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. साई समाधानने आपली गुणवत्ता कायम ठेवावी असे आवाहन तनपुरे यांनी केले.
यावेळी माजी खा.प्रसाद तनपुरे यांचा हॉटेल साई समाधानचे सर्वेसर्वा दत्तात्रय दरंदले यांनी सन्मान केला.
यावेळी सुनील विश्वासराव, दत्तात्रय साळुंके, सचिन शिंदे आदिंसह साई समाधानचे कर्मचारी उपस्थित होते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत