देवळाली प्रवरा(वेबटीम) देवळाली प्रवरा येथील एकाने व्यवसायासाठी वीज वितरण कंपनीकडून कनेक्शन घेतलं होतं. मात्र त्याला त्याच कनेक्शनमधून जास्त ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
देवळाली प्रवरा येथील एकाने व्यवसायासाठी वीज वितरण कंपनीकडून कनेक्शन घेतलं होतं. मात्र त्याला त्याच कनेक्शनमधून जास्त लोड म्हणजे जादा अधिभार हवा होता. यासाठी देवळाली प्रवरा येथील खासगी ठेकेदारास ५१ हजार रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी रंगेहात पकडले आहे.
सुधीर भास्कर पठारे (वय 34 वर्ष, व्यवसाय – खासगी ठेकेदार, रा. देवळाली प्रवरा, ता. राहुरी. जिल्हा. अहमदनगर) असे या खासगी लाचखोर ठेकेदाराचं नाव आहे. याप्रकरणी त्याच्याविरुध्द राहुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
वास्तविक पाहता या कामासाठी सदर खासगी ठेकेदार सुधीर पठारे याने तक्रारदाराला दि. ३ /१२/२०२२ रोजी १ लाख २ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. त्यापैकी लाचेच्या रकमेच्या अर्धी रक्कम म्हणजे ५१ हजार रुपये काम सुरू करण्यापूर्वी ५ डिसेंबर रोजी घेतली.यातील तक्रारदार यास त्याच्या व्यवसायाकरिता वापरात असलेल्या वीज कनेक्शन मीटर चे १५ एचपी वरून ४० एचपी लोड वाढवून देण्याच्या मोबदल्यात यातील ठेकेदार सुधीर पठारे यानेे वैयक्तिक ओळखीचा फायदा घेतला.
स्वत:च्या आर्थिक फायद्यापोटी तक्रारदार यास वीज कनेक्शन भार वाढवून देण्याच्या मोबदल्यात लाचेची मागणी करून ती पंच साक्षीदार यांच्या समक्ष स्वीकारली.म्हणून त्याच्याविरुध्द भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७ अ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
श्रीमती शर्मिष्ठा वालावलकर (पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक), एन. एस. न्याहळदे (अप्पर पोलीस अधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक), नरेंद्र पवार (वाचक पोलीस उप अधीक्षक, ला. प्र. वि, नाशिक परिक्षेत्र, नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप घुगे (पोलीस निरीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक), श्रीमती गायत्री जाधव, (पोलीस निरीक्षक) यांच्यासह पोलीस हवालदार एकनाथ बाविस्कर, पोलीस नाईक प्रकाश महाजन, पो. ना. राजेंद्र गीते,पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे (सर्व नेमणूक- लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक) यांनी कारवाई केली आहे.
दरम्यान लाचेच्या जाळ्यात खासगी ठेकेदाराबरोबर देवळाली प्रवरा येथील महावितरण कार्यालयात काम करणारा एक कनिष्ठ अभियंत्यांचा या प्रकरणात समावेश असल्याची चर्चा सोमवारी सायंकाळ पासून देवळाली व फॅक्टरी परिसरात सुरू होती. नव्हे नव्हे तर संबधित अधिकाऱ्याला लाचलुचपत प्रतिबंधात्मक पथकाने ताब्यात घेतल्याची माहिती चर्चेतून पुढे आली होती. मात्र या प्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर सुधीर पठारे या ठेकेदारावरच गुन्हा दाखल झाल्याने वेगवेगळ्या चर्चेला उधाण आले आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत