राहुरी फॅक्टरी येथील व्यापारी जयेश देसर्डा यांचा अपघाती मृत्यू! - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरी येथील व्यापारी जयेश देसर्डा यांचा अपघाती मृत्यू!

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)  राहुरी फॅक्टरी येथील ४२ वर्षीय व्यापारी जयेश देसर्डा यांचा रात्रीच्या दरम्यान अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



 राहुरी फॅक्टरी येथील ४२ वर्षीय व्यापारी जयेश देसर्डा यांचा रात्रीच्या दरम्यान अपघाती मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रकिया सुरू होती.



याबाबत पोलीस सूत्रांकडून समजलेली माहिती अशी की, जयेश देसर्डा यांचे गुहा गावात किराणा दुकान आहे. किराणा दुकानातील काम आटोपल्यानंतर जयेश हे  राहुरी फॅक्टरी येथे घरी जात असताना नगर-मनमाड मार्गावरील पेट्रोल मुसमाडे  पंपानजीक परराज्यातील एका वाहन चालकाशी देसर्डा यांची शाब्दिक चकमक उडाली.


 त्यानंतर देसरडा यांनी आपली दुचाकी पेट्रोल पंप परिसरात लावून सदर मालवाहतूक ट्रकच्या चालकाला ड्रायव्हर साईटला जाऊन खाली उतरवत होते.परंतु मालवाहतूक ड्रायव्हर खाली न उतरता त्याने ट्रक चालू केला. त्यामुळे देसरडा हे ड्रायव्हर साइडच्या पायरीवर पाय ठेऊन ड्रायव्हर साईडच्या खिडकीला लटकले.

सदर मालवाहतूक ट्रक जोगेश्वरी आखाडा काका ढाबा परिसरातील पोहच असतानाच रस्त्यावर एकेरी वाहतूक चालू असल्याने समोरून कापूस घेऊन चाललेले वाहन  आणि सदरचे मालवाहतूक गाडी जवळजवळ घासून गेल्याने यामध्ये देसर्डा दबल्या गेले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.त्यामुळे देसरडा यांचा मृत्यू अपघाती की घातपात? याबाबत चर्चा सुरू होती.


मयत देसर्डांच्या  पाठीमागे आई-वडील, भाऊ-भावजय, तीन मुले, बहिनी असा मोठा परिवार आहे



सदर अपघाताने राहुरी तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.हा अपघात की घातपात याबाबत देखील नातेवाईकांनी संशय व्यक्त केला आहे.


दरम्यान आज सकाळी पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे, पोलीस उपनिरीक्षक सज्जनकुमार नार्हेडा यांनी अपघात स्थळी पाहणी केल्यानंतर मुसमाडे पेट्रोल पंप व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता एका कॅमेरात परराज्यातील ट्रक चालक व देसरडा यांच्यात बाचाबाची सुरू असल्याचे दिसून आले . तर देसरडा यांची दुचाकी पेट्रोल पंप परिसरात पार्क केलेली आढळून आली आहे.


याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्याचे काम सुरू होते. तर पोलिसांकडून सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन व  पेट्रोल पंपावरील कामगार यांची चौकशी करून तपास सुरू होता.


सायंकाळी जयेश यांच्यावर आज 5 वाजता राहुरी फॅक्टरी येथील अमरधाम येथे वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत