राहुरी(वेबटीम) राहुरी शहरातील डॉ.पवार हॉस्पिटल(शिवांकुर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल) यांच्यावतीने टाकळीमिया येथील समर्थ क्लिनिक सोनवणे हॉस्प...
राहुरी(वेबटीम)
राहुरी शहरातील डॉ.पवार हॉस्पिटल(शिवांकुर मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल) यांच्यावतीने टाकळीमिया येथील समर्थ क्लिनिक सोनवणे हॉस्पिटल येथे बुधवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ ते दुपारी १२ वाजेपर्यंत मोफत शिबिर आयोजित करण्यात आले.
या शिबिरातडॉ. किशोर पवार(MS., ENT (Ayu.) कान, नाक, घसा तज्ञ) हे कान, नाक, घसा निदान व उपचार तसेच श्रवणयंत्र सल्ला, कान, नाक, घसा शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे कान, नाक, घसा तपासणी व श्रवणदोष तपासणी व उपचार करणार आहेत.
तसेचडॉ. शुभांगी पवार (MS Obst/Gyn (Ayu.) स्त्रीरोग, प्रसुती शास्त्र व वंध्यत्व तज्ञ) ह्या स्त्रीरोग चिकित्सा व प्रसुतीगृह विभाग प्रसुतीपूर्व तपासणी स्त्रीरोग तपासणी मेनॉपॉज क्लिनीक वेदना विरहीत प्रसुती गर्भपिशवीची शस्त्रक्रिया वंध्यत्व चिकित्सा व उपचार गर्भसंस्कार, विवाह पूर्व तपासणी व मार्गदर्शन करणार आहेत.
तसेच डॉ. प्रतिक चौहान (BDS (PIMS) दंतशल्य चिकित्सक) हे एक्स-रे मशिन कॉस्मेटिक किलींग, रूट कॅनॉल क्राऊन ब्रिज (फिक्स दात), दात काढणे हिरड्यांवर उपचार दात बसवणे (डेंटल इम्प्लांट) दातांमध्ये सिमेंट भरणे, दातांचे सौंदर्य वाढविणे लहान मुलांच्या दाताची तपासणी व उपचार वेडे वाकडी व पुढे आलेले दात सरळ करणे यावर मार्गदर्शन करणार आहेत.
तरी या शिबिराचा गरजू रुग्णांनी लाभ घ्यावा व नाव नोंदणीसाठी 9922161434, 9150313912 या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत