राहुरी फॅक्टरीतील ओंकारेश्वर मंदिरात आ. सत्यजित तांबे यांनी घेतले दर्शन - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीतील ओंकारेश्वर मंदिरात आ. सत्यजित तांबे यांनी घेतले दर्शन

  राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूररोड वरील ओंकारेश्वर मंदिरात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. सत्यजित तांबे य...

 राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-

राहुरी फॅक्टरी येथील श्रीरामपूररोड वरील ओंकारेश्वर मंदिरात नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आ. सत्यजित तांबे यांनी दर्शन घेतले. यावेळी ओंकारेश्वर मित्र  मंडळाच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.

नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार  सत्यजित तांबे यांचा राहुरी तालुक्याती आभारप्रदर्शन दौरा सुरू असताना ओंकारेश्वर मंदिराला भेट देऊन भगवान ओंकारेश्वरचे मनोभावे पूजा करून दर्शन घेतले.


यावेळी आ.तांबे यांनी ओंकारेश्वर मंडळाच्या धार्मिक व सामाजिक कामाची माहिती घेऊन ओंकारेश्वर मंडळाच्या विविध उपक्रमांचे कौतुक केले.


 प्रसंगी ओंकारेश्वर मित्र मंडळाचे अध्यक्ष विलासराव मुसमाडे, उपाध्यक्ष  किशोर थोरात, साई सेवेचे चेअरमन श प्रदीपराव येवले, डॉ बबनराव वाकचौरे, गणपतराव शिंदे, उत्तमराव घोलप, दिलीपराव गागरे, मुकुंद वेदपाठक, राजेंद्र बोरूडे, बाळासाहेब आढाव,ॠतुराज थोरात,प्रणित रत्नपारखी, रविंद्र आडसुळ, आदि मंडळाचे सर्व सदस्य व अनेक पदवीधर मतदार उपस्थित होते.


 शेवटी योगप्रशिक्षक किशोर थोरात यांनी सर्वांचे आभार मानले

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत