राहुरी(वेबटीम) राहुरी तालुका बार असोसिएशनची निवडणूक सन २०२३ ची प्रक्रिया पार पडली असून अध्यक्ष पदासाठी अँड.ऋषीकेश मोरे तर उपाध्यक्ष पदासाठ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुका बार असोसिएशनची निवडणूक सन २०२३ ची प्रक्रिया पार पडली असून अध्यक्ष पदासाठी अँड.ऋषीकेश मोरे तर उपाध्यक्ष पदासाठी अँड. मच्छिंद्र देशमुख विजयी झाले आहेत.
सेक्रेटरी पदाच्या दोन जागा बिनविरोध झालेल्या आहेत त्यात अँड.संदिप खपके तर सह सेक्रेटरी अँड. मनोज पारखे, निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून अँड.भगवान उऱ्हे यांनी कामकाज पाहिले त्यांना अँड.शशिकांत देशमुख यांनी मदत केली .
बार मधील सर्व सदस्यांनी नवनिर्वाचित अध्यक्ष, उपाध्यक्ष व सेक्रेटरी आदिंचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करण्यात येऊन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत