आंबी-देवळाली प्रवरा रस्त्याचे घोडे अडले कुठे? - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

आंबी-देवळाली प्रवरा रस्त्याचे घोडे अडले कुठे?

आंबी (संदिप पाळंदे)   श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे सात कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लहू कानडे ...

आंबी (संदिप पाळंदे) 



 श्रीरामपूर विधानसभा मतदारसंघातील सुमारे सात कोटींच्या विविध विकासकामांचे उद्घाटन मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार लहू कानडे यांच्या शुभहस्ते व युवक काँग्रेसचे महासचिव करण ससाणे यांच्या प्रमुख उपस्थितीत सुमारे वर्षं भरापूर्वी आंबी (ता. राहुरी) येथे संपन्न झाले होते. 

   या विकासकामांमध्ये राहुरी तालुक्यातील वर्दळीचा असलेल्या आंबी ते देवळाली प्रवरा या सुमारे एक किमीच्या रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण कामाचा समावेश होता. त्यासाठी 'रोडकरी' आमदार लहू कानडे यांनी तब्बल २५ लक्ष रुपये निधी उपलब्ध करून दिला होता. मात्र या रस्त्याच्या उद्घाटनाला तब्बल एक वर्ष उलटूनही प्रत्यक्षात कामाला अजूनही सुरुवात न झाल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे. या रस्त्यासाठी मंजूर झालेला निधी कुठे गायब झाला का? ठेकेदाराला प्रत्यक्ष कामाला अजून मुहूर्त का मिळाला नाही? सरकार बदलल्यामुळे या रस्त्याला 'स्थगिती' मिळाली आहे का? या रस्त्याचा निधी इतरत्र वापरला गेला का? असा सवाल प्रवासी वर्गातून विचारला जात आहे. रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने नागरिक व प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत असून विद्यार्थी, शेतकरी, नोकरदार, दुग्धव्यवसायिक यांना मोठा त्रास होत आहे. तरी लवकरात लवकर सदर रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे.


"आंबी-देवळाली प्रवरा रस्त्याचे प्रत्यक्ष काम एक वर्षांपासून रखडले असले तरी मजबुतीकरण व डांबरीकरण काम लवकरात लवकर सुरू करण्यासाठी आमदार लहू कानडे साहेब यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष काम सुरू होईल अशी आशा आहे."

- विजय डुकरे (उपसरपंच, आंबी)



 उद्घाटनाचा फलकाला फुटले पाय?

आमदार लहू कानडे यांच्या हस्ते आंबी ते देवळाली प्रवरा या रस्त्याच्या २५ लक्ष रुपये खर्चाच्या मजबुतीकरण व डांबरीकरण उद्घाटनाचा साक्ष देणारा व आ. कानडे यांनी स्वतः फीत कापलेला माहिती देणारा फलक 'गायब' झाल्याने या फलकला पाय फुटले की कोणी गायब केला? का रस्त्याला कायमस्वरूपी 'स्थगिती' तर मिळाली नाही ना? या चर्चेला उधाण आले आहे.



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत