राहुरी(वेबटीम) तालुक्यातील श्री क्षेत्र देसवंडी येथे आजपासून १०८ कुंडीय आदिशक्ती-शिवशक्ती महायज्ञास उत्साहात प्रारंभ करण्यात आला. देसवंडी ये...
राहुरी(वेबटीम)
तालुक्यातील श्री क्षेत्र देसवंडी येथे आजपासून १०८ कुंडीय आदिशक्ती-शिवशक्ती महायज्ञास उत्साहात प्रारंभ करण्यात आला. देसवंडी येथील संजय महाराज शिरसाठ यांच्या मार्गदर्शनाखाली सात दिवस विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. तसेच संजय महाराज दि.१७ ते २७ तारखेपर्यंत १०० फुट उंच वटवृक्षावर ज्ञानेश्वरी व नवनाथ पारायण करणार असून महाराष्ट्रात पहिल्यांदाच असा सोहळा होत आहे.
राहुरी तालुक्यातील देसवंडी येथील सोहमेश्वर राधाकृ्ष्ण देवस्थान येथे हा कार्यक्रम सुरु झाला आहे. महाराष्ट्रात प्रथमच वटवृक्षावर बसून ज्ञानेश्वरी व नवनाथ पारायण तसेच १०८ कुंडिय आदिशक्ती महायज्ञ होत आहे. दि. १७ ते २७ तारखेपर्यंत वटवृक्षावर पारायण, दि. २७ तारखेला मिरवणूक सोहळा, दि. २८ तारखेला महायज्ञ व १ मार्चला या सोहळ्याची सांगता होईल. मिरवणुकीसाठी पंचदशनाम जुन्या आखाड्याचे गंगाभारती महाराज, घोण्शी येथील दत्तात्रय देवस्थानचे बळीराम महाराज, संतोष महाराज, कैलाशनाथ महाराज, गणेश महाराज यांच्यासह आखाड्यातील साधु-संतांची उपस्थिती राहणार आहे.
या सप्ताहानिमित्त रोज विविध नामवंत महाराजांची कीर्तने आयोजित करण्यात आली आहेत. या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन संजय महाराज शिरसाठ यांनी केले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत