राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील सतरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला कॉलेजला जाताना व येताना तरुण त्रास देत असल...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील सतरा वर्षे वयाच्या अल्पवयीन मुलीला कॉलेजला जाताना व येताना तरुण त्रास देत असल्याने या तरुणीने आत्महत्या केल्याची संतापजनक घटना पिंपरी निर्मळ येथे घडली आहे. लोणी पोलिसांनी तीन आरोपींवर याबाबत गुन्हे दाखल केले असून दोघांना अटक केली आहे.
पिंपरी निर्मळ येथील तरुणी बाभळेश्वर येथे कॉलेज जात असताना बाभळेश्वर येथील दोघे राहुरीतील एक अशा तिघांनी तिला वारंवार त्रास दिल्यामुळे या तरुणीने पंढरीनाथ सारंगधर पवार यांच्या शेततळ्यामध्ये आत्महत्या केली. पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, सपोनी युवराज आठरे, पोसई सर्व योगेश शिंदे यांनी घटनास्थळाला भेट दिली. या मुलीच्या चुलत्यांच्या फिर्यादीवरून तिघांवर लोणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी मयुर दिलीप पवार रा. राहुरी फॅक्टरी, किरण मच्छिंद्र गुंजाळ रा. बाभळेश्वर या दोघांना पोलीसांनी अटक केली आहे. तर साहील कैलास राजळे रा. बाभळेश्वर हा आरोपी पसार आहे. पुढील तपास लोणी पोलीस स्टेशनचे सपोनी युवराज आठरे करीत आहेत.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत