बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा विज द्या... बापुराव जावळे - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिवसा विज द्या... बापुराव जावळे

सोनेवाडी ( वार्ताहर)  कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक भागात बिबट्यांचा वावर आहे. पोहेगाव चांदेकसारे परिसरात बिबट्याच्या धास्तीने शेतकरी धास्तावले...

सोनेवाडी ( वार्ताहर) 



कोपरगाव तालुक्यामध्ये अनेक भागात बिबट्यांचा वावर आहे. पोहेगाव चांदेकसारे परिसरात बिबट्याच्या धास्तीने शेतकरी धास्तावले आहे. शेतकरी व शेतमजुरांना बिबट्या व बछड्यांचे दर्शन झाल्यामुळे या परिसरात बिबट्या असल्याचे वन विभागानेही मान्य केले आहे. त्यामुळे या परिसरात शेतकरी आपल्या शेतात शेती पिकांना पाणी देण्यासाठी रात्री जाण्याचे टाळत आहे त्यामुळे शेती पिकाचे प्रचंड नुकसान होत आहे हे टाळण्यासाठी विद्युत वितरण कंपनीने बिबट्याचा वावर असलेल्या ठिकाणी शेतकऱ्यांना विद्युत मोटारींसाठी दिवसा विज पुरवठा उपलब्ध करून द्यावा अशी मागणी गौतम सहकारी बँकेचे उपाध्यक्ष बापूराव जावळे यांनी केली आहे.

गेल्या काही महिन्यापासून पोहेगाव सोनेवाडी चांदेकसारे अदी भागात बिबट्याचा वावर आहे. अनेक शेतकरी व शेतमजुरांनी या बिबट्याला आपल्या डोळ्यांनी पाहिल्यामुळे ते धास्तावले आहे. वन विभागालाही यासंदर्भात कल्पना दिलेली आहे. याच परिसरात या बिबट्याने रात्री अनेक शेतकऱ्यांच्या शेळ्या मेंढ्या कोंबड्या खाऊन फस्त केल्या आहे. पाळीव कुत्रे व रानातील कुत्रे या बिबट्याने संपवले आहे. त्यामुळे या बिबट्याची जास्त दहशत निर्माण झाली आहे. सध्या शेतकऱ्यांच्या शेतात असलेला कांदा हा काढनीला आला आहे तर अजूनही काही शेतकऱ्यांच्या कांद्याला शेवटचे पाणी देणे गरजेचे आहे. बिबट्याच्या धास्तीमुळे शेतकऱ्यांना रात्री शेतात जाणे जोखमीचे वाटत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना वीजपुरवठा रात्री देण्या ऐवजी दिवसा महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीने द्यावा अशी मागणी बापूराव जावळे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत