सोनेवाडी ( वार्ताहर) विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे सहकार सोसायटीची स्थापना करून शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत सह...
सोनेवाडी ( वार्ताहर)
विना सहकार नाही उद्धार या उक्तीप्रमाणे सहकार सोसायटीची स्थापना करून शेतकऱ्यांना कमी व्याजदराने कर्ज उपलब्ध करून देत सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे.चांदे विकास सोसायटीही यात कमी नसून अनेक सभासदांना त्यांनी कर्ज वितरण करत शेतकऱ्यांना मायेचा दिला आहे. जिल्ह्यात बँक व मेंबर पातळीवर वसूल देणारी ही संस्था नंबर एक ठरली आहे त्यामुळेच चांदे विकास सोसायटी प्रगती कडे वाटचाल करत आहे असे प्रतिपादन काळे कारखान्याचे माजी उपाध्यक्ष आनंदराव चव्हाण यांनी केले. ते काल कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथे संचालक बोर्ड व सभासदांना मार्गदर्शन करताना बोलत होते.
संस्थेने बँक व मेंबर पातळीवर जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला त्यामुळे संस्थेचे अध्यक्ष दगु सखाराम होन, उपाध्यक्ष मधुकर कारभारी खरात ,सचिव गोरक्षनाथ छबुराव फटांगरे यांचा तर गौतम बँकेचे उपाध्यक्ष बापूराव जावळे, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगातून तालुका कृषी अधिकारी पदी निवड झाल्याबद्दल सीमा जावळे यांचा संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात आला.यावेळी पाराजी होन, कर्मवीर शंकरराव काळे कारखान्याचे संचालक शंकरराव चव्हाण ,उपसरपंच सचिन होन,चंद्रकांत होन, बापुराव जावळे,सयराम गुडघे,नामदेव होन,संदिप होन,पुंजाजी होन, बाळासाहेब खंडिझोड, शरद होन, सौ.गीताबाई चव्हाण, राधुजी कोळपे, धनंजय चव्हाण,अर्जुन होन ,मधुकर होन,रावसाहेब होन,विलास चव्हाण,राजु होन,किरण होन ,शरद होन, प्रा. भाऊसाहेब होन , कर्णा चव्हाण, हसन सय्यद, युनुस शेख, रवी खरात अदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सचिव गोरक्षनाथ फटांगरे यांनी केले तर आभार संचालक शंकरराव चव्हाण यांनी मानले

कोणत्याही टिप्पण्या नाहीत