कोपरगाव (वार्ताहर) तालुक्यातील सोनेवाडी गावात पिढ्यानपिढ्यापासून अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. कथा, कीर्तन स्वाध्याय परिवाराचे विचार ये...
कोपरगाव (वार्ताहर)
तालुक्यातील सोनेवाडी गावात पिढ्यानपिढ्यापासून अनेक धार्मिक कार्यक्रम होत असतात. कथा, कीर्तन स्वाध्याय परिवाराचे विचार येथे रुजवले जातात. सर्वांनी एकत्र येऊन अखंड हरिनाम सप्ताह ,किर्तन महोत्सव अदी केलेले कार्यक्रम यशस्वी झालेले आहेत. मुळातच सोनेवाडी गावाला अध्यात्मिक व धार्मिक वारसा लाभलेला आहे असे प्रतिपादन संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपिनदादा कोल्हे यांनी केले.
ते काल सोनेवाडी ग्रामस्थांकडून निमंत्रण स्वीकारताना सहकार महर्षी शंकरराव कोल्हे कारखाना कार्यस्थळावर बोलत होते.
विरभद्र बिरोबा महाराज किर्तन महोत्सव समितीच्या वतीने बिपिनदादा कोल्हे, आमदार स्नेहलता कोल्हे, सहकार महर्षी कोल्हे कारखान्याचे अध्यक्ष विवेक कोल्हे यांना काल कीर्तन महोत्सवाचे निमंत्रण पत्रिका देण्यात आली. कोल्हे परिवार तुमच्या कीर्तन महोत्सवात सहभागी असून कार्यक्रमात भेट देण्यासाठी व किर्तन महत्त्वाचा आनंद घेण्यासाठी गावात येणार असल्याचेही कोल्हे यांनी जाहीर केले.
यावेळी निरंजन गुडघे, नंदकिशोर जायपत्रे, ग्रामपंचायतीचे सदस्य आबासाहेब जावळे,चिलुभाऊ जावळे, सोनवडी सोसायटीचे संचालक दिलीप गुडघे, राहुल राऊत अदी उपस्थित होते. शेवटी निरंजन गुडघे यांनी आभार मानले..

कोणत्याही टिप्पण्या नाहीत