श्रीरामपूर(वेबटीम) श्रीरामपूर तालुक्यातील मौजे भेर्डापूर येथे शेतात विज पडली असून दोघांचा मृत्यू झाला असून अन्य एक जखमी आहे. आज सायंकाळी श...
श्रीरामपूर(वेबटीम)
श्रीरामपूर तालुक्यातील मौजे भेर्डापूर येथे शेतात विज पडली असून दोघांचा मृत्यू झाला असून अन्य एक जखमी आहे.
आज सायंकाळी श्रीरामपूर तालुक्यात काही भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. याच वेळी भेर्डापूर येथील दांगट वस्ती येथे वीज पडल्याने शेती मालक प्रमोद भाऊसाहेब दांगट (वय 42
वर्ष) यांचा तर शेतमजूर श्रीमती अलका रामदास राऊत (वय 50 वर्ष) यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेत श्रीमती संगीता रवींद्र साळे (वय 42) जखमी आहे.
घटनेची माहिती मिळताच खा.सदाशिव लोखंडे, आ.लहू कानडे, माजी आ.भानुड मुरकुटे, राष्ट्रवादीचे अविनाश आदिक, माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे, सचिन गुजर, शिर्डी संस्थानचे माजी विश्वस्त सुरेश वाबळे यांनी साखर कामगार हॉस्पिटल येथे धाव घेतली आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत