आंबी(वेबटीम) श्रीरामपुर तालुक्यातील फत्याबाद ग्रामपंचायतचे माजी सदस्य, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष व हिंदु धर्मरक्षक सेनेचे प...
आंबी(वेबटीम)
श्रीरामपुर तालुक्यातील फत्याबाद ग्रामपंचायतचे माजी सदस्य, भाजपा भटके विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष व हिंदु धर्मरक्षक सेनेचे प्रदेशाध्यक्ष दत्तात्रय पोपटराव खेमनर यांची भारतीय जीवजंतू कल्याण बोर्डच्या (भारत सरकार) महाराष्ट्र राज्य चेअरमनपदी निवड करण्यात आली.
भारतीय जनता पार्टी व हिंदु धर्मरक्षक सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष योगी सनीनाथजी यांच्या शिफारासीने दताञय खेमनर यांची भारतीय जीव जंन्तु कल्याण बोर्डच्या (भारत सरकार) चेअरमनपदी नियुक्त करण्यात आले. ही संस्था मत्सपालन पशुपालनभारतीय जीवजंतू कल्याण बोर्डच्या चेअरमपदी दत्तात्रय खेमनर व डेअरी मंञालय भारत सरकार यांच्या नियंत्रणा खाली काम करते. यामध्ये पशुपालन, मत्सपालन, गोशाळा व्यवस्थापन असे विविध उपक्रम राबवणे, त्यांना शासकीय अनुदान देणे, जीवजंतू यांची रक्षा करणे यांची आदी उपक्रम राबवते.
दत्तात्रय खेमनर यांची महाराष्ट्र राज्याच्या चेअरमनपदी निवड झाल्याबदल श्री श्री १००८ परमहंस कालीदास बाबा, महंत बालयोगी परमहंस प्रकाश महाराज, स्वामी अरूणाथगिरी महाराज, पालकमंञी तथा महसुल मंञी नामदार राधाकृष्ण विखे पाटील, माजी खासदार डॉ. विकास महात्मे, भारतीय अन्न व खाद्य निगम महामंडाळाचे संचालक बापुसाहेब शिंदे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग, भाऊ डेव्लपर्स चे प्रसाद म्हसे, भाजपा तालुका अध्यक्ष दिपक पटारे, जि. प. सदस्य शरद नवले, राष्ट्रवादी युवक जिल्हा उपाध्यक्ष मनोज भिसे, युवक काँग्रेस शहर अध्यक्ष अभिजीत लिप्टे, भाजपा अनूसुचित जाती मोर्चा शहराध्यक्ष मोहन आढागळे, धनगर समाज संघर्ष समितीचे राहुरी तालुकाध्यक्ष जालिंदर रोडे आदींनी अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत