राहुरी(वेबटीम) राहुरी तालुक्यातील गुहा येथील तांभेरे रोडवरील वाबळे वस्तीवरील श्री साईबाबा मंदिर येथे मंगळवार दि.१८ एप्रिल ते सोमवार दि.२४ ...
राहुरी(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील गुहा येथील तांभेरे रोडवरील वाबळे वस्तीवरील श्री साईबाबा मंदिर येथे मंगळवार दि.१८ एप्रिल ते सोमवार दि.२४ एप्रिल २०२३ या कालावधीत साई सच्चरित् पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.
वाबळे वस्ती येथे श्री.साई मंदिराची प्रतिष्ठापणा करण्यात आली असून याठिकाणी विवीध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते.
मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पारायण सोहळ्यात परिसरातील माता-भगिनी- तरुण सहभागी होणार आहे.
मंगळवार २५ एप्रिल रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत महंत ह.भ.प उद्धव महाराज मंडलिक(नेवासेकर) यांच्या काल्याचे किर्तनाने व महाप्रसाद वाटपाने पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे.
तरी या कार्यक्रमास उपस्थित रहावे असे आवाहन समस्त वाबळे परिवार यांनी केले आहे.,

कोणत्याही टिप्पण्या नाहीत