कोपरगाव(वेबटीम) महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील मार्केट कमिटी च्या निवडणुका सध्या जाहीर झाल्या आहेत.परंतु ह्या निव...
कोपरगाव(वेबटीम)
महाराष्ट्र सरकार ने जाहीर केलेल्या अहमदनगर जिल्ह्यातील मार्केट कमिटी च्या निवडणुका सध्या जाहीर झाल्या आहेत.परंतु ह्या निवडणुका चालू असताना कोपरगांव तालुक्यातील किसान काँग्रेस च्या पदाधिकऱ्यांनीही ह्या निवडणुकांना मध्ये निवडणूक फॉर्म भरून सहभाग घेतला आहे व तसेच आपण येणारे सर्व निवडणुका महाविकास आघाडी मध्ये लढणार आहोत,असे असले तरीही कोपरगांव तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस महाविकास आघाडी मध्ये आपल्या काँग्रेस पक्षाला जागा देऊन महाविकास आघाडीचा धर्म पाळावा, अशी मागणी श्री विजयराव सुधाकर जाधव पाटील उपाध्यक्ष, अहमदनगर किसान काँग्रेस यांनी केली आहे
माझा प्रदेशाध्यक्षांकडे एक प्रश्न आहे की महाविकास आघाडी ही फक्त आमदारकी आणि खासदारकी पुरतीच आहे का ? व असे असल्यास स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये आपली काँग्रेस ची भूमिका काय?
असा प्रश्न माझ्या सारख्या सर्व सामान्य कार्यकर्त्याला पडलेला आहे .....आणि जर महविकास आघाडी मध्ये होणाऱ्या निवडणुका मध्ये सर्व सामान्य कार्यकर्त्याला फक्त सतरंजी उचलण्याचे काम करावे लागणार आहे का?
ग्रामीण भागातील कार्यकर्त्याने फक्त आमदारकी खासदारकी ला घोषणा द्याच्या का? असा सवाल विजय सुधाकर जाधव यांनी उपस्थित केला आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत