देवळाली प्रवरा(वेबटीम) राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्री.त्र्यंबकराज स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत ...
देवळाली प्रवरा(वेबटीम)
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्री.त्र्यंबकराज स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत श्री.साईनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा मंगळवार दि.९ मे ते गुरुवार दि. ११ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला असून यानिमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
देवळाली प्रवरा येथील श्री.साई प्रतिष्ठानच्या निर्धारातून व शहरवासीयांच्या ऐच्छिक दानातून देवळाली प्रवरा गावाच्या वैभवात भर घालणारे श्री सच्चिदानंद सदगुरु साईनाथ महाराजांचे मूर्तीची भव्य-दिव्य मंदिर उभारण्यात आले असून यानिमित्ताने प्राणप्रतिष्ठा व मंदिराचा कलशारोहण समारंभ सोहळा मंगळवार दि.९ मे ते गुरुवार दि. ११ मे २०२३ या कालावधीत संपन्न होत आहे.
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथे श्री.त्र्यंबकराज स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभूमीत श्री.साईनाथ महाराज मूर्ती प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन सोहळा मंगळवार दि.९ मे ते गुरुवार दि. ११ मे २०२३ रोजी आयोजित करण्यात आला असून यानिमित्त त्रिदिनी कीर्तन महोत्सव व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यानिमित्ताने रविवार ९ मे व सोमवार १० मे २०२३ रोजी सकाळी ९ ते १.३० तसेच दुपारी ३ ते ६ या वेळेत पूजा व होमहवन व सायंकाळी ४ ते ६ हरिपाठ संपन्न होणार आहे.
मंगळवार ९ मे रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ह.भ.प नरेंद्र महाराज गुरव(मालेगाव) यांचे कीर्तन त्यानंतर महाप्रसाद, बुधवार १० मे रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत ज्ञानेश्वरीताई बागुल यांचे कीर्तन व महाप्रसाद
तर गुरुवार ११ मे रोजी सकाळी ८ ते १० या वेळेत सद्गुरू साईनाथ महाराज मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहन महंत उद्धव महाराज मंडलिक यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे.
गुरुवार ११ मे रोजी सायंकाळी ७ ते ९ या वेळेत भाषाप्रभू जगन्नाथ महाराज पाटील यांच्या काल्याच्या किर्तनाने व देवळाली प्रवरा शहरवासीयांच्यावतीने काला महाप्रसादाने सोहळ्याची सांगता होणार आहे.
तरी या कार्यक्रमास देवळाली प्रवरा व पंचक्रोशीतील भाविकांनी उपस्थित राहून 'सोहळा आनंदाचा' कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री साई प्रतिष्ठान व शहरवासीयांनी केले आहे.
शनिवार ६ मे रोजी भव्य मिरवणूक
दरम्यान शनिवार दि ६ मे रोजी सकाळी ८ वाजता साई मंदिर प्राणप्रतिष्ठा व कलशारोहननिमित्ताने देवळाली प्रवरा सोसायटी चौक ते साई मंदिर पर्यन्त भव्य दिव्य मिरवणूक सोहळा संपन्न होणार असून भाविक व शहरवासीयांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत