राहुरी फॅक्टरीत आज जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

राहुरी फॅक्टरीत आज जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धा

  राहुरी फॅक्टरी/प्रतिनिधी:- राहुरी फॅक्टरी येथील शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या पुर्व संध्येला आज रविवार दि.३० एप्रिल रोजी ...

 राहुरी फॅक्टरी/प्रतिनिधी:-

राहुरी फॅक्टरी येथील शौर्य प्रतिष्ठानच्या वतीने महाराष्ट्र दिनाच्या पुर्व संध्येला आज रविवार दि.३० एप्रिल रोजी सायंकाळी ६ वा. जिल्हास्तरीय नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील उदयोन्मुख कलावंतांना प्रोत्साहन मिळावे या हेतूने डॉ.तनपुरे कारखान्याच्या मंगल कार्यालय प्रांगणात मोठा - लहान गट सामूहिक नृत्य व लहान-मोठा गट सोलो नृत्य या प्रकारात हि स्पर्धा संपन्न होणार आहे.

या स्पर्धेसाठी सामूहिक नृत्य मोठ्या गटास प्रथम पारितोषिक ११ हजार १११ रुपये मुंबई उच्च न्यायालयाचे विधिज्ञ शशिकांत संसारे यांच्याकडून तर द्वितीय ७ हजार रुपयांचे पारितोषिक काँग्रेसचे जिल्हा सचिव अजय खिलारी यांच्याकडून दिले जाणार आहे.सामुहिक नृत्य लहान गटासाठी प्रथम पारितोषिक ७ हजार रुपयांचे शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे तालुकाप्रमुख सचिन म्हसे यांच्याकडून तर द्वितीय बक्षीस ५ हजार रुपयांचे साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांच्याकडून दिले जाणार आहे.

सोलो नृत्य मोठा गटासाठी प्रथम पारितोषिक ६  हजार रुपयांचे चैतन्य उद्योग समूहाचे अध्यक्ष गणेश भांड यांच्याकडून द्वितीय ५ हजार रुपयांचे पारितोषिक जगदंब प्रतिष्ठानचे अध्यक्ष सचिन कोठुळे तर तृतीय बक्षीस ४ हजार रुपये राहुरी अर्बन क्रेडिट सोसायटीचे चेअरमन प्रशांत काळे यांच्याकडून दिले जाणार आहे.

तर सोलो नृत्य लहान गटासाठी प्रथम पारितोषिक ४ हजार रुपये  स्वराज्य उद्योग समूहाचे अध्यक्ष किशोर गडाख यांच्याकडून व्दितीय पारितोषिक ३ हजार रुपये स्व.प्रमिलाताई कोळसे यांच्या स्मरणार्थ प्रमोद कोळसे यांच्याकडून दिले जाणार आहे.तर तृतीय पारितोषिक २५०१ रुपये वैष्णवी चौक युवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष वसंत कदम यांच्याकडून दिले जाणार आहे.



या नृत्यस्पर्धेसाठी  राहुरी पोलीस ठाणे, तनपुरे कारखाना, देवळाली प्रवरा नगरपरिषद, वैष्णवी चौक, सर्व पत्रकार बांधव व विविध मंडळ तसेच समाजातील विविध दानशूर मंडळींचे सहकार्य लाभले आहे.

जिल्ह्यातील अहमदनगर, कोपरगाव, राहाता, नेवासा, अकोले, संगमनेर, जामखेड, राहुरी,या तालुक्यातील कलाकारांनी आपली नावनोंदणी केली असून नावनोंदणी पूर्ण झाली आहे.

या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत