राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरालगत श्रीरामपूर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मायलेक गंभीर जखमी झाले असता या...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा शहरालगत श्रीरामपूर रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात मायलेक गंभीर जखमी झाले असता यातील आईचा मात्र दुर्दैवी मृत्यू झाला असून मुलाची मात्र मृत्यूशी झुंज सुरू आहे सदर तरुणाचा एक हात व एक पाय या अपघातामध्ये निकामी झाल्याचे कळते.
श्रीरामपूर राहुरी फॅक्टरी रस्त्यावर देवळाली प्रवरा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर काल सायंकाळी सहा वाजेच्या दरम्यान इंडिगो सीएस व दुचाकी वाहनामध्ये भीषण अपघात झाला.
राहुरी फॅक्टरी कडून श्रीरामपूरच्या दिशेने जाणाऱ्या इंडिगो कार क्रमांक एम एच 14 एक्स 6040 या वाहनावरील ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने त्याने श्रीरामपूर कडून राहुरी फॅक्टरीच्या दिशेने जाणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच 16 एपी 358 वरील माय-लेकाला जोराची धडक दिली.
या धडके नंतर सदर मायलेक जवळपास पंधरा ते वीस फूट उडून जवळच्या शेतामध्ये जाऊन पडले. यामध्ये मायलेेकांना जबर मार लागल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यानंतर काही सुज्ञ नागरिकांनी ॲम्बुलसला फोन केल्यानंतर रवी देवगिरे, पप्पू कांबळे व ॲम्बुलन्स चालक नागरिकांच्या मदतीने या दोघांना राहुरी फॅक्टरी येथील वामन हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले .
त्यानंतर आईची तब्येत जास्त झाल्याने त्यांना उपचारासाठी विळद घाट येथे हलवण्यात आले होते. यामध्ये सदर मातेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर सदर युवक मृत्यूशी झुंज देत आहे .
सदर जखमी युवकाचे नाव अभिजित पोपट वाघमारे (वय.16कोंची मांची तालुका संगमनेर) असे असून मयत आईचे नाव संगिता पोपट वाघमारे (वय 45 कोंची मांची तालुका संगमनेर ) असे आहे.
अपघात झाल्यानंतर नागरिकांनी अपघात असताना मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात धाव घेतली होती. तर अपघातानंतर रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची मोठी गर्दी झाली होती. आई व मुलाचा अशा प्रकारे अपघात झाल्याने अनेकांनी यावेळी हळ हळ व्यक्त केली तर अपघात बघणाऱ्या काही महिलांना अश्रू अनावर झाले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत