सात्रळ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र संशोधन केंद्रास पुणे विद्यापीठाची मान्यता - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

सात्रळ महाविद्यालयाच्या रसायनशास्त्र संशोधन केंद्रास पुणे विद्यापीठाची मान्यता

सात्रळ/वेबटीम:-:  लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्...

सात्रळ/वेबटीम:-: 

लोकनेते डॉ. बाळासाहेब विखे पाटील (पद्मभूषण उपाधीने सन्मानित) प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सात्रळ (ता. राहुरी) येथील रसायनशास्त्र संशोधन केंद्रास सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची मान्यता मिळाली असून या केंद्रामार्फत ग्रामीण भागातील संशोधक विद्यार्थ्यांसाठी विज्ञान विज्ञान शाखेमध्ये संशोधनाचे दालन खुले झाले असल्याची माहिती प्राचार्य प्रो. (डॉ.)  प्रभाकर माणिकराव डोंगरे यांनी दिली.

         रसायनशास्त्र संशोधन केंद्राच्या अंतर्गत प्रो. (डॉ.) शिवाजी पंडित, डॉ. अमित वाघमारे, डॉ. विजय कडनोर यांना अगोदरच पुणे विद्यापीठाची पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून मान्यता मिळालेली आहे. येथील तज्ज्ञ सदस्यांचे विविध आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय जर्नल्स मध्ये शोधनिबंध प्रसिद्ध झालेले आहेत. रसायनशास्त्र संशोधन केंद्राचे विविध औषधनिर्मिती कंपन्या बरोबर तसेच पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या विविध संशोधन केंद्रासोबत सामंजस्य करार झालेले आहेत. रसायनशास्त्र संशोधन केंद्र मान्यतेसाठी रसायनशास्त्र विभाग प्रमुख डॉ. अमित वाघमारे, शैक्षणिक संशोधन समन्वयक डॉ. विजय कडनोर, उपप्राचार्य डॉ. दीपक घोलप, उपप्राचार्य डॉ. जयश्री सिनगर, कार्यालयीन अधीक्षक श्री. विलास शिंदे, श्री. महेंद्र तांबे तसेच सर्व प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेतले. 

          ग्रामीण भागात कार्यरत असणाऱ्या सात्रळ महाविद्यालयाच्या या उल्लेखनीय यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष नामदार श्री. राधाकृष्ण विखे पाटील, सौ. शालिनीताई विखे पाटील व खासदार डॉ. सुजय विखे पाटील, प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे सहसचिव श्री. भारत पा. घोगरे, अति. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. शिवानंद हिरेमठ, पद्मश्री विखे पाटील महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) प्रदीप दिघे तसेच स्थानिक सल्लागार समितीने संशोधन केंद्रास मान्यता मिळाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत