देवळाली प्रवरा/वेबटीम:- शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री उध्दव ठाकरे यांचे आदेशाने शिवसेना सचिव,खासदार श्री अनिल देसाई यांचे ...
देवळाली प्रवरा/वेबटीम:-
शिवसेना( उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख श्री उध्दव ठाकरे यांचे आदेशाने शिवसेना सचिव,खासदार श्री अनिल देसाई यांचे अध्यक्षतेखालील शिवसेना ग्राहक संरक्षण कक्षाचे अहमदनगर जिल्ह्यातील पदाधिकारी नुकतेच जाहिर करण्यात आले.
अहमदनगर जिल्ह्यातील जिल्हा ग्राहक संरक्षण कक्षाचे कक्ष जिल्हा सहसंघटकपदी देवळाली प्रवरा येथील सेवानिवृत्त अभियंता श्री दत्ता कडुपाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचेकडे कोपरगांव,श्रीरामपुर,राहुरी , नेवासा या तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
सर्व सेवा क्षेत्रात ग्राहक हा महत्वाचा घटक असुन त्यावरच सर्व सेवाक्षेत्रे अवलंबुन असतात.परंतु अनेक ठिकाणी सेवा देताना ग्राहकांची अडवणुक करत विलंब केला जातो.अश्या ठिकाणी शिवसेना ग्राहक संरक्षण कक्ष ग्राहकास चांगली सेवा तीहि वेळेत मिळुन देणे, तसेच ग्राहकांची काही फसवणुक वा आर्थीक नुकसान झाले असेल तर त्याची भरपाई मिळवुन देण्याचे काम हा शिवसेना ग्राहक संरक्षण करत असतो. ग्राहकांना त्यांचे हक्काची जाणीव करुन देत सजग नागरिक बनविण्याचे काम या कक्षाचे मार्फत होत असते.
श्री दत्ता कडु हे सेवानिवृत्त अभियंते असुन २६ वर्ष मंत्रालयात अनेक मंत्र्यांसोबत काम केल्याने त्याचे प्रंशासकीय अनुभवाचा ग्राहकांचे प्रश्न सोडविण्यास नक्कीच मदत होणार आहे.
मा पक्षप्रमुख उध्दवसाहेब न् सचीव श्री अनिल देसाई यांनी मोठ्या विश्वासाने हि जबाबदारी आपल्यावर सोपवली असुन त्यांना अभिप्रेत असलेले काम मी प्रामाणीकपणे करुन ग्राहकांना न्याय देण्याचा प्रयत्न करेल अशी भावना श्री दत्ता कडुपाटील यांनी व्यक्त केली.
या निवडीमुळे देवळाली शहर न् परिसरांत आनंदाचे व्यक्त करण्यात येत आहे. जुन्या जेष्ठ ,अभ्यासु , प्रशासकिय अनुभव असलेल्या व्यक्तींची निवड झाल्याने ग्राहक चळवळीस चालना मिळेल असा विश्वास या निमित्ताने नागरिक व्यक्त करत आहेत. त्यांचे निवडीचे ग्राहक संरक्षण कक्षाचे राज्य प्रतिनिधी श्री मुकंद सिनगर , जिल्हा संघटक श्री अशोक थोरे,शिवसेना तालुका प्रमुख सचिन म्हसे , शहरप्रमुख श्री अनिल चव्हाण, कुमावत समाजाचे जिल्हाध्यक्ष श्री विजय कुमावत यांनी स्वागत केले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत