पारनेर(वेबटीम) पारनेर तालुक्यातून वाहने चोरून इतरत्र विकणार्या टोळीस पकडण्यात सुपा पोलीसांना यश आले आहे. इरफान हारून खान (25), मुश्पीक नि...
पारनेर(वेबटीम)
पारनेर तालुक्यातून वाहने चोरून इतरत्र विकणार्या टोळीस पकडण्यात सुपा पोलीसांना यश आले आहे. इरफान हारून खान (25), मुश्पीक निजाम सय्यद (27), मुस्ताफ सय्यद (19, रा. सर्व देवळाली प्रवरा, ता. राहुरी) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत.
याबाबत सुपा पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार 3 मे रोजी सुपा पोलीस सुपा गावात रात्र गस्त घालत असताना त्यांना एका दुचाकीवर तिघेजन संशयितरीत्या फिरताना आढळून आले. पोलीसांनी त्यांना हटकले असता. तिघांनी गाडी सोडून पळ काढला. पोलीसांनी पाठलाग करून यातील इरफान खान यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता ते सुपा येथे पिकअप वाहन चोरण्यासाठी आले असल्याचे त्याने सांगीतले.
पळुन गेलेल्या दोन्ही संशयितांचा पत्ता घेऊन सुपा पोलीसांनी राहुरीत पथक पाठवून देवळाली प्रवरातील दोघांना जेरबंद केले. त्यांच्याकडून एक पिकअप वाहन व एक दुचाकी जप्त करण्यात आली. ही वाहने त्यांनी गंगापुर पोलीस ठाणे हद्दीतून चोरल्याचे सांगीतले. तसेच एक पिकअप बोलेरो गाडी श्रीरामपूर येथील संदिप जगन साठे यास विक्री केल्याचे तपासातून निष्पन्न झाले.
मात्र तो फरार झाला आहे. ही कामगिरी उपविभागीय अधिकारी अजित पाटील, यांच्या मार्गदर्शनाखाली सुपाच्या पोलीस निरिक्षक ज्योती गडकरी, पोलीस कर्मचारी कानगुडे, रमेश शिंदे, खंडेराव शिंदे, संदिप पवार, कल्याण लगड व पोलीस शिपाई ठोंबरे यांनी केली.
.jpeg)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत