प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून मुदत वाढीसाठी महावितरणला पत्र - आवाज जनतेचा

Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

News

latest

प्राधिकृत अधिकाऱ्यांकडून मुदत वाढीसाठी महावितरणला पत्र

राहुरी फॅक्टरी(वेबटीम) थकीत वीज बिलापोटी डॉ.तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील वीज पुरवठा महावितरणने कट केला असताना कामगार वर्गातून तीव्र संताप...

राहुरी फॅक्टरी(वेबटीम)



थकीत वीज बिलापोटी डॉ.तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील वीज पुरवठा महावितरणने कट केला असताना कामगार वर्गातून तीव्र संताप व्यक्त होत असतानाच कारखाना प्राधिकृत अधिकाऱ्यांनी तातडीने यात लक्ष घालून महावितरण अभियंता यांना पत्र पाठवून वीज बिल भरण्यासाठी मुदतवाढ मागवून वीज पूर्ववत करण्याची विनंती केली आहे.


 महावितरणचे ९ लाख हजार २२० रुपये वीज बिल अदा केले नाही म्हणून डॉ.तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील वीज पुरवठा शुक्रवारी सायंकाळी महावितरणने कट केला. ऐन उन्हाळ्यात विद्युत पुरवठा कट केल्याने कामगार कुटूंबियांनी संताप व्यक्त केला.


दरम्यान तनपुरे कारखाना प्राधिकृत अधिकारी प्रकाश सैंदाणे यांनी तातडीने दखल कामगार कुटूंबिय अंधारात राहू नये म्हणून महावितरणचे कार्यकारी अभियंता यांना पत्र पाठविले आहे.



या पत्रात म्हंटले की, डॉ. बा.बा. तनपुरे सह. सा.का. लि., श्रीशिवाजीनगर या कारखान्याचे प्राधिकृत अधिकारी म्हणून आम्ही दि. २१/०३/२०२३ रोजी पदभार घेतलेला आहे. कारखान्याची आर्थिक परिस्थिती बिकट असून आपले रक्कम रु. ९,२०,२२० रुपये इतके वीजबिल मिळालेले आहे. 


सदर बिलाची मुदत दिनांक ०३/०५/२०२३ अखेर देय आहे. सदरचे बील माहे मे २०२३ अखेर भरणा करण्यासाठी मुदत वाढ मिळावी व सदर रकमेचे हप्ते पाडून दिल्यास भरणा करण्याची दक्षता घेण्यात येईल. तरी सदरचे कट केलेले वीज कनेक्शन पुर्ववत करण्यात  यावे असे म्हंटले आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत