राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- देवळाली प्रवरा श्रीरामपूर रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये आईनंतर आज मुलाचा देखील दुर्दैवी अंत झालेला आहे.या घटनेमुळ...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
देवळाली प्रवरा श्रीरामपूर रस्त्यावर झालेल्या अपघातामध्ये आईनंतर आज मुलाचा देखील दुर्दैवी अंत झालेला आहे.या घटनेमुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत माहिती अशी की, गेल्या दोन दिवसांपूर्वी देवळाली प्रवरा शहरापासून 3 किलोमीटर अंतरावर श्रीरामपूर राहुरी फॅक्टरी रस्त्यावर भीषण अपघात झाला होता.
या अपघातामध्ये इंडिगो सीएस या वाहनावरील वाहकाचे नियंत्रण सुटल्याने दूचाकी वर असणाऱ्या मायलेकांना जबर धडक दिली होती.
यामध्ये माय-लेकास मोठ्या प्रमाणात मार लागल्याने त्यांना राहुरी फॅक्टरी येथील दवाखान्यामध्ये उपचारासाठी हलवण्यात आले होते. व त्यानंतर विळद घाट येथे उपचारासाठी नेण्यात आले.
काल यातील आई संगिता पोपट वाघमारे वय 45 कोचीमांची तालुका संगमनेर यांचे उपचारादरम्यान निधन झाले
तसेच मुलगा अभिजित पोपट वाघमारे वय.16 कोचीमांची हा गंभीर असल्याने त्याला पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये हलवण्यात आले होते मात्र दुर्दैवाने उपचारादरम्यान त्याचा देखील मृत्यू झालेला आहे.
माय लेकांच्या निधनामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त होत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत