राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- येथील डॉ.तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील विद्युत पुरवठा महावितरण कडून खंडीत करण्यात आला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
येथील डॉ.तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील विद्युत पुरवठा महावितरण कडून खंडीत करण्यात आला आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून थकीत असलेल्या अंदाजे ९ लाख २० हजार रुपये कारखान्याने न भरल्याने महावितरण कार्यलयाकडून आज शुक्रवारी विद्युत पुरवठा खंडीत केला आहे.याबाबत महावितरण अधिकाऱ्यांनी पुष्टी दिली आहे.
गेल्या आठवड्यात कामगार वसाहत येथे तांत्रिक बिघाडामुळे पाणी पुरवठा बंद होता.त्यामुळे कामगार कुटूंबियांचे हाल झाले. आता ऐन उन्हाळ्यात विद्युत पुरवठा खंडीत केल्याने नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे.
तनपुरे कारखाना कॉलनीतील वीज प्रश्नी खा.सुजय विखे यांच्या माध्यमातून कॉलनीसाठी स्वतंत्र रोहित्र देण्यात आले.मात्र विखे यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ जावून प्रशासनाने कारभार हातात घेतला
तनपुरे कारखाना कामगार वसाहतीतील वीज, पाणी आदी प्रश्न उपस्थित झाल्यास प्रशासक याकडे फारस गांभीर्याने बघत नसल्याने कारखाना कामगारांची त्रेधात्रिरपट उडत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत