राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे कारखाना कामगार वसाहत येथे थकीत वीज बिलामुळे महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित केला हो...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
राहुरी फॅक्टरी येथील डॉ.तनपुरे कारखाना कामगार वसाहत येथे थकीत वीज बिलामुळे महावितरणकडून विद्युत पुरवठा खंडित केला होता. तातडीने करखाना प्रशासक अधिकाऱ्यांनी महावितरणला बिल अदा केल्याने आज सायंकाळी महावितरणने विद्युत पुरवठा जोडणी केली आहे.
तनपुरे कारखाना कामगार वसाहत येथील कामगार कुटुंबीय अंधारात राहू नये या दृष्टीने प्रशासकीय अधिकारी प्रकाश सैंदाणे यांनी तातडीने हालचाली करून महावितरणला सुरुवातीला सहकार्य करण्याची विनंती करण्याबाबत पत्र पाठविले मात्र महावितरणने त्यास नकार दर्शविला. त्यावर प्रशासकाने योग्य ती तजविज करून थकीत वीज बिलाची रक्कम अदा केली. त्यामुळे आज सायंकाळी खंडीत विद्युत पुरवठा जोडणी करून सुरळीत केला आहे.
भविष्यात तनपुरे कारखाना कामगार वसाहतीचा विजेचा प्रश्न भेडसावू नये यासाठी कामगार कुटुंबियांशी कामगारांशी बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेतला जाणार आहे.कारखान्याचे कामगार व कुटुंबीय अंधारात राहू नये ही आपली प्रामाणिक भावना असल्याने कामगार बांधवानी सहकार्य करावे असे आवाहन प्रशासक प्रकाश सेंदाणे यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत