राहुरी फॅक्टरी/वेबटीम:- तू आमच्या घरी राहायचे नाही तू जर इथे राहिलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही तुला जीवे ठार मारु अशी सुनेला धमकी देणाऱ्या...
राहुरी फॅक्टरी/वेबटीम:-
तू आमच्या घरी राहायचे नाही तू जर इथे राहिलीस तर तुला जिवंत ठेवणार नाही तुला जीवे ठार मारु अशी सुनेला धमकी देणाऱ्या सासू-सासर्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात अली आहे.
राहुरी फॅक्टरी येथील गुंजाळ नाका परिसरात राहणाऱ्या रचना अमोल घुले ह्या आपल्या लहान मुलासह राहतात परंतु सासू-सासरे व ननंद यांच्या नेहमीच्या छळास कंटाळून रचना अमोल घुले यांनी राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
सासू-सासरे व ननंद यांच्याविरोधात फिर्यादीने दाखल केलेल्या फिर्यादीत म्हंटले की, तू आमच्या घरी राहू नको तू येथून निघून जा अन्यथा तुला जीवे ठार मारू अशी वारंवार धमकी देणाऱ्या सासू आरोपी मंगल वासुदेव घुले, वासुदेव लक्ष्मण घुले व नणंद वर्षा अतुल आहेर यांच्या विरोधात फिर्यादीने राहुरी पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.
या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक मेघशाम डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉन्स्टेबल सुनील निकम हे करीत आहेत.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत